मोबाईलसाठी ओरिजनल चार्जर घ्या, नाहीतर मोबाईल होईल खराब! ‘या’ गोष्टींची काळजी घ्या आणि बनावट चार्जर घेण्यापासून वाचा

Ajay Patil
Published:
mobile charger

सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला स्मार्टफोन दिसून येतो. सध्याचे तरुण-तरुणी पासून तर वयस्कर व्यक्तींपर्यंत स्मार्टफोन ही आता एक आवश्यक गरज बनलेली आहे. परंतु हा स्मार्टफोन कार्यान्वित करण्यासाठी तो चार्ज असणे खूप गरजेचे असते. स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी आपण चार्जरचा वापर करतो.

जेव्हा आपण स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा त्या स्मार्टफोन सोबत त्याच कंपनीचे ओरिजनल चार्जर आपल्याला मिळत असते. परंतु कालांतराने ते चार्जर खराब होते व आपण दुसरे चार्जर बाजारातून खरेदी करतो. परंतु असे चार्जर खरेदी करताना आपण ते बनावट आहे की ओरिजनल हे पाहत नाहीत.

त्यामुळे बनावट चार्जर खरेदी केल्यामुळे व त्याद्वारे फोन चार्ज केला तर फोनची बॅटरी खराब होण्याची शक्यता असते आणि फोन लवकरात लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या स्मार्टफोनचे आयुष्य वाढवायचे असेल तर चार्जर ओरिजनल असणे खूप गरजेचे आहे.

परंतु चार्जर बनावट आहे की ओरिजनल हे कसे ओळखावे हे देखील महत्त्वाचे आहे. कारण जर बनावट चार्जर आपण घ्यायला गेलो तर ते स्वस्त मिळते व त्यामुळे आपण ते खरेदी करतो. परंतु तुम्हाला जर चार्जर खरेदी करायचे असेल भविष्यात होणारे स्मार्टफोनचे  नुकसान टाळायचे असेल तर चार्जर खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे व काही टिप्स फॉलो करणे खूप गरजेचे आहे.

 चार्जर खरेदी करा परंतु या गोष्टींची काळजी घ्या

1- डिझाईनकडे लक्ष द्या जर आपण ब्रॅण्डेड कंपनीचे चार्जर पाहिले तर तुलनेमध्ये बनावट चार्जरपेक्षा ब्रँडेड कंपन्यांच्या चार्जरची रचना किंवा डिझाईन ही उत्तम असते. म्हणजेच त्या चार्जरचे सर्व कनेक्टर आणि पोर्ट हे चार्जर मध्ये पूर्णपणे व्यवस्थित फिट म्हणजेच इन्स्टॉल केलेले असतात. त्या तुलनेमध्ये बऱ्याचदा बनावट चार्जरचे जे काही कनेक्टर आणि पोर्ट असतात ते ढीले असतात.

2- ब्रँडचे नाव पहावे सर्व ओरिजनल चार्जर पाहिले तर त्या चार्जरच्या ब्रँडचे नाव नेहमीच बरोबर असते म्हणजेच त्याच्या स्पेलिंग मध्ये काही चूक नसते. परंतु त्या तुलनेमध्ये जर बनावट चार्जर पाहिले तर त्यावरील ब्रँडचे नाव हे चुकीचे असते किंवा त्या नावामध्ये थोडाफार तरी फरक किंवा बदल आपल्याला दिसून येतो.

3- चार्जरवरील सील पहा जर आपण ओरिजनल किंवा मूळ चार्जर पाहिले तर ते नेहमीच सील बंद असते किंवा त्यावर सील असतो. परंतु बनावट चार्जर कोणत्याही प्रकारचे सील नसते किंवा सील तुटलेले असते.

4- विजेचा वापर जर आपण ओरिजनल चार्जरचा विचार केला तर ते बनावट चार्जरच्या तुलनेत कमी वीज वापरतो. बनावट चार्जरला मात्र जास्त वीज लागते.

5- सगळ्यात महत्त्वाचा असतो फोनचा चार्जिंग होण्याचा कालावधी यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही ओरिजनल किंवा मूळ चार्जरने मोबाईल चार्ज केला तर तो पटकन चार्ज होतो. परंतु बनावट चार्जरने चार्जिंगचा स्पीड खूप कमी असतो व स्मार्टफोन चार्ज व्हायला वेळ लागतो.

 चार्जर खरेदी करा परंतु या टिप्स फॉलो करा

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला चार्जर खरेदी करायचे असेल तर ते तुमच्या ओळखीच्या किंवा विश्वास असलेल्या दुकानातूनच खरेदी करणे गरजेचे आहे. तुम्हाला जर ते ऑनलाईन खरेदी करायचे असेल तर मात्र सावधगिरी बाळगून आणि विश्वासार्ह असलेल्या संकेतस्थळावरून किंवा वेबसाईटवरूनच खरेदी करावे.

त्याच्यावरचा मॉडेल नंबर व्यवस्थित तपासून घ्यावा व मूळ चार्जरवर नेहमी मॉडेल क्रमांक हा दिलेला असतो. तसेच चार्जरची वारंटी किती आहे ते तपासा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ओरिजनल चार्जर किंवा मूळ चार्जर जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा त्यासोबत वॉरंटी कार्ड हे असतेच. तसेच चार्जरची किंमत जर पाहिली तर ओरिजनल चार्जरची किंमत ही बनावट चार्जरच्या तुलनेत जास्त असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe