Realme GT 5 : उद्या लाँच होणार 240W फास्ट चार्जिंग फोन, मिळेल 24GB रॅम आणि शक्तिशाली प्रोसेसर; किंमत फक्त..

Ahmednagarlive24 office
Published:
Realme GT 5

Realme GT 5 : भारतीय मार्केटमध्ये सर्वात लोकप्रिय टेक कंपनी Realme सतत आपले अनेक स्मार्टफोन लाँच करत असते. यापैकी काही स्मार्टफोन इतर कंपन्यांना टक्कर देत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनी आपल्या सर्वच स्मार्टफोनमध्ये नवनवीन फीचर्स देत असते.

अशातच आता उद्या मार्केटमध्ये 240W फास्ट चार्जिंग फोन Realme GT 5 लाँच होणार आहे. त्याशिवाय यामध्ये 24GB रॅम, जबरदस्त प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा मिळत आहे. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय असेल.

कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी

आज, कंपनीकडून स्वतः पुष्टी करण्यात आली आहे की आगामी फोन Realme GT 5 स्मार्टफोन OIS समर्थनासह 50-मेगापिक्सेल Sony IMX890 प्राथमिक कॅमेरासह सुसज्ज असणार आहे. परंतु कंपनीने या फोनवरील इतर कॅमेर्‍यांची फीचर्स अजूनही उघड केलेली नसली तरी, असे दिसत आहे की प्राथमिक कॅमेर्‍यासह, यात 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स IMX890 मिळेल.

तसेच कंपनीने अशीही पुष्टी केली आहे की नवीन स्मार्टफोन Wi-Fi 7 कनेक्टिव्हिटीसाठी समर्थनासह ग्राहकांना खरेदी करता येईल. तसेच इन-हाउस वाय-फाय 7 सुधारणांमुळे त्याच्या गेल्या मॉडेलच्या तुलनेत सरासरी गेम लेटन्सीमध्ये 20ms कमी होईल.

तसेच या स्मार्टफोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, 144Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा OLED फुल एचडी प्लस डिस्प्ले असणारा Realme GT 5 फोन, Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 1TB पर्यंत स्टोरेज, 24GB पर्यंत RAM तसेच Realme वर आधारित Android 13 OS. UI 4.0 आणि मागील बाजूच्या RGB लाइट युनिटसह येऊ शकतो. तसेच बॅटरीच्या बाबतीत हा फोन दोन प्रकारांमध्ये येईल – 4600mAh बॅटरीसह 240W चार्जिंग आणि 5240mAh बॅटरी पर्यायासह 150W जलद चार्जिंग मिळेल.

हा स्मार्टफोन प्रगत ट्रिपल-फ्रिक्वेंसी GPS पोझिशनिंग सिस्टमला समर्थन देऊ शकतो. हा फोन तीन GPS फ्रिक्वेन्सी म्हणजे L1, L2 आणि L5, तसेच B1I, B1C, B2a, आणि B2b सिग्नलसह चार फ्रिक्वेन्सी Beidou कॉन्फिगरेशन एकत्र करेल. हे जटिल सेटअप नेव्हिगेशनमध्ये अचूकता अनु शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe