Redmi Note 14 Smartphone Series:- भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून कमीत कमी किमतीतले परवडणारे आणि भन्नाट असे वैशिष्ट्ये असलेली स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेले आहेत व त्यांना ग्राहकांकडून देखील तितकाच प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
अनेक कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत मिड बजेट सेगमेंटमध्ये उत्तम असे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन घेणे आता शक्य झाले आहे.
अगदी याच पद्धतीने भारतीय बाजारपेठेत redmi च्या माध्यमातून देखील मिड बजेट सेगमेंटमध्ये रेडमी नोट 14 स्मार्टफोन सिरीज लॉन्च करण्यात आली असून या सिरीज अंतर्गत रेडमी नोट 14, रेडमी नोट 14 प्रो आणि रेडमी नोट 14 प्रो + असे तीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेले आहेत.
विशेष म्हणजे या तीनही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. तसेच या तीनही स्मार्टफोनमध्ये गोरिला ग्लास संरक्षणासह AMOLED कर्व्हड डिस्प्ले देखील दिला आहे.
काय आहेत रेडमी नोट चौदा स्मार्टफोन सिरीजचे वैशिष्ट्ये?
1- रेडमी नोट 14(5G)- रेडमी नोट 14 हा या सिरीज मधील पहिला स्मार्टफोन जर बघितला तर त्यामध्ये अनेक भन्नाट वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा 6.67 इंचाचा FHD+ प्रकारचा असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे व रिझोल्युशन बघितले तर ते 2400×1080 इतके देण्यात आले आहे.
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यामध्ये मेन कॅमेरा 50 मेगापिक्सल+ आठ मेगापिक्सल+ दोन मेगापिक्सल अशा पद्धतीचे आहेत. उत्तम सेल्फीकरिता यामध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे.
स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सीटी 7300 अल्ट्रा या प्रोसेसरवर हा स्मार्टफोन काम करतो.तसेच उत्तम बॅटरी पावर करिता यामध्ये 5110mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती 45W चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच हा स्मार्टफोन टायटन ब्लॅक, मिस्टीक व्हाईट आणि फँटम पर्पल या तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे.
किती आहे या स्मार्टफोनची स्टोरेज आणि किंमत?
रेडमी नोट 14 या स्मार्टफोनच्या सहा जीबी+ 128 जीबीची किंमत 18999, आठ जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 19 हजार 999 रुपये तर आठ जीबी+ 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 21 हजार 999 रुपये इतकी आहे.
2- रेडमी नोट 14 प्रो(5G)- या स्मार्टफोन मध्ये 6.67 इंचाचा 3D कर्व्हड AMOLED डिस्प्ले दिला असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल+ आठ मेगापिक्सल+ दोन मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून सेल्फी कॅमेरा वीस मेगापिक्सलचा आहे.
तसेच हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सीटि 7300 अल्ट्रा प्रोसेसर वर काम करतो. तसेच यामध्ये 5500mAh क्षमतेची बॅटरी दिली असून ती बॅटरी 45W चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन्स स्पेक्ट्रे ब्लू तसेच फँटम पर्पल व टायटन ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनची स्टोरेज व स्टोरेज नुसार किंमत
या स्मार्टफोनच्या आठ जीबी+ 128 जीबी व्हेरियंटची किंमत 24 हजार 999 रुपये इतकी आहे.तर आठ जीबी+ 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 26999 रुपये इतकी आहे.
3- रेडमी नोट 14 प्रो +(5G)- या स्मार्टफोनमध्ये देखील 6.67 इंचाचा 3D कर्व्हड AMOLED डिस्प्ले दिला असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तसेच यामध्ये देखील ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ आठ मेगापिक्सल अशा प्रकारचे कॅमेरे देण्यात आले असून उत्तम सेल्फीकरिता वीस मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
तसेच हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 या प्रोसेसरवर काम करतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 6200mAh क्षमतेची बॅटरी दिली असून ती 90W चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन देखील तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला असून यामध्ये स्पेक्ट्रे ब्लू, फँटम पर्पल आणि टायटन ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
किती आहे स्टोरेज व स्टोरेजनुसार किंमत?
या स्मार्टफोनची किंमत जर बघितली तर ती आठ जीबी+ 128 जीबी व्हेरिएंटची किंमत तीस हजार 999 रुपये, आठ जीबी+ 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 32 हजार 999 रुपये तर बारा जीबी+ 512 जीबी व्हेरियंटची किंमत 35 हजार 999 रुपये इतकी आहे.