Redmi 14C Smartphone:- तुम्हाला जर कमीत कमी किमतीमध्ये उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन जर खरेदी करायचा असेल व तुम्ही बजेटमध्ये मिळेल असा स्मार्टफोन शोधत असाल तर तुमचा शोध आज थांबणार असून अतिशय कमी किमतीत उत्तम असे वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन रेडमी या कंपनीने आज भारतासह जागतिक बाजारपेठेमध्ये लॉन्च केला.
या स्मार्टफोनचे नाव रेडमी 14C असे असून यामध्ये अनेक उत्कृष्ट अशी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.त्यामुळे कमी किमतीत चांगली वैशिष्ट्य असलेला हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमधील असून ग्राहकांना तो नक्कीच फायद्याचा ठरेल.
किती आहे या स्मार्टफोनची स्टोरेज कॅपॅसिटी आणि त्यानुसार किंमत?
रेडमीने हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये आणि तीन स्टोरेज पर्यायसह लॉन्च केला आहे. यामध्ये स्टारलाईट ब्लू, स्टार डस्ट पर्पल आणि स्टार सेज ब्लॅक असे तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनची चार जीबी रॅम आणि 64 जीबीची स्टोरेज असलेले बेस व्हेरियंटची किंमत 9999 रुपये इतकी आहे. 10 जानेवारीपासून हा स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जर आपण या स्मार्टफोनची व्हेरिएंटनुसार किमती बघितल्या तर..
1- चार जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9 हजार 999 रुपये आहे.
2- चार जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत दहा हजार 999 रुपये आहे.
3- सहा जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 11999 रुपये आहे .
रेडमी 14C स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
1- कसा आहे डिस्प्ले?- या स्मार्टफोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.88 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा कमाल ब्राईटनेस 600 nits इतका आहे.
2- कसा आहे कॅमेरा?- या स्मार्टफोनमध्ये उत्तम फोटोग्राफी करिता 50 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे व सेल्फी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करिता आठ मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला आहे.
3- कसा देण्यात आला आहे प्रोसेसर?- या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 चिप्स देण्यात आला आहे व हे अँड्रॉइड 14 वर आधारित शाओमी हायपर OS वर चालते.
4- स्टोरेज कसे आहे?- हा स्मार्टफोन तीन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला असून यामध्ये चार जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज दुसरा प्रकार चार जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आणि तिसरा प्रकार म्हणजे सहा जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असे तीन प्रकार देण्यात आलेले असून यामध्ये जर मायक्रो एसडी कार्ड वापरले तर स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवता येते.
5- बॅटरी आणि चार्जिंग- या स्मार्टफोन मध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 5160mAh क्षमतेची बॅटरी दिली असून फास्ट चार्जिंग करीता या स्मार्टफोनसोबत 33W चा चार्जर देखील दिला आहे.