Satbara Utara:- सातबारा उतारा हे शेतकऱ्यांशी निगडित असलेले एक महत्त्वाचे कागदपत्र असून याला जमिनीचा आरसा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्याला माहित आहेच की सातबारा उतारे किंवा फेरफार उतारे, जमिनीच्या संबंधित जुन्या नोंदी काढण्याकरिता तलाठी कार्यालयामध्ये जायला लागायचे.
परंतु आता शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र भूमि अभिलेख सातबारा आणि 8 अ अभिलेख ऑनलाईन करण्याच्या सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामुळे आता भूलेख महाभूमी वेब पोर्टलच्या माध्यमातून अगदी घरबसल्या 1980 पासूनचे जुने फेरफार व सातबारा उतारे तुम्हाला डाऊनलोड करून त्याची प्रिंट देखील काढता येऊ शकते.
या पोर्टलचा वापर करून तुम्ही गट नंबर किंवा सर्वेक्षण नंबर टाकून सातबारा ऑनलाइन पाहू शकतात. याकरिता महसूल विभागाच्या माध्यमातून bhulekh.mahabhumi.gov.in हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. त्यासोबतच तुम्हाला जमिनीचा नकाशा पाहिजे असेल तर त्याकरिता mahabhunakasha.mahabhumi.gov.in हे पोर्टल सुरू केलेले आहे.
1980 पासूनचे सातारा उतारे मोबाईल वरून अशा पद्धतीने डाऊनलोड करा
1- यासाठी तुम्हाला गुगल किंवा इतर कुठल्याही वेब ब्राउझर मध्ये जाऊन त्या ठिकाणी आपले अभिलेख(Aaple Abhilekh) असे टाईप करून सर्च करावे लागेल व यानंतर हे पोर्टल ओपन होते.
2- या पोर्टलवर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, घराचा पत्ता आणि लॉगिनची माहिती देऊन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असते व रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून घ्यावे.
3- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडावा लागतो. त्यानंतर तालुका, गावाचे नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. निवड केल्यानंतर तुम्हाला कोणता उतारा हवा आहे त्याची निवड करायची असते.
4- तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ अ चा उतारा हवा असेल तर 8अ असे पर्याय त्या ठिकाणी असतात व त्यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडायचा आहे. यामध्ये जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार आहेत.
5- त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
6- त्यानंतर सर्च रिझल्ट म्हणजेच शोध निकाल या पेजवर टाकलेल्या गट क्रमांक शी संबंधित फेरफाराची माहिती तुम्हाला पाहायला मिळते.
7- फेरफारच वर्ष आणि क्रमांक त्या ठिकाणी दिलेला असतो. तुम्हाला ज्या वर्षाचा सातबारा किंवा इतर कागदपत्र हवे आहे त्या वर्षावर क्लिक करून तुम्ही संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकतात.
8- त्या ठिकाणी सर्च या बटणावर क्लिक करून डाऊनलोड अवेलेबल फाईल या बटनावर क्लिक करावे.
9- तुम्ही जी माहिती भरलेली असते त्यानुसार तुमच्या स्क्रीनवर काही सर्च रिझल्ट येतात. यामध्ये तुम्हाला जुने सातबारा उतारे आणि फेरफार नंबर वर्षानुसार दिसतात. यामध्ये तुम्हाला जे हवे आहे त्याला ऍड टू कार्ट करावे लागते.
10- शेवटी कार्टमध्ये जाऊन ती फाईल ओपन करा आणि तुमचा जुना सातबारा किंवा जुनी फेरफार उतारे बघा. या फाईलचे तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकतात.
अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने 1980 पासूनचे सातबारा उतारे व फेरफार पाहू शकतात.