Smartphone Tips: तुम्हालाही तुमच्या मोबाईलमध्ये कमी स्टोरेजची समस्या येत आहे का? तर वापरा या टिप्स, होईल फायदा

Ajay Patil
Published:
smartphone tips

Smartphone Tips:- आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला स्मार्टफोन दिसून येतो. बाजारामध्ये आपल्याला अनेक कंपन्यांचे आणि वेगवेगळे वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन सध्या मिळतात. जेव्हाही आपण स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा त्याची रॅम किती आहे?

याचा पहिल्यांदा विचार करत असतो. कारण सध्या बाजारामध्ये जास्त रॅम आणि स्टोरेज असलेले स्मार्टफोन भरपूर प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. परंतु तरी देखील मोबाईलमधील स्टोरेजची समस्या आपल्यापैकी कित्येक जणांना येत असेल.

स्मार्टफोनच्या कमी मेमरीमुळे अनेक वेळा आपल्याला या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. कारण स्मार्टफोन म्हटले म्हणजे त्यामध्ये अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील असतात आणि त्यासोबत अनेक महत्त्वाचे ॲप्स देखील असतात.

परंतु कमी मेमरीमुळे अनेकदा आपल्याला स्टोरेजचे समस्या येत राहते. त्यामुळे आपण या लेखामध्ये अशा काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत ज्यामुळे  स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या स्टोरेजच्या समस्येपासून आपण मुक्तता मिळवू शकतो.

 या टिप्स वापरा आणि मोबाईलमधील स्टोरेजची समस्या मिटवा

1- क्लाऊड स्टोरेज वापरा स्मार्टफोनच्या बाबतीत आपण बघितले तर सर्वात जास्त मेमरीचा वापर हा फोटो आणि व्हिडिओ यांच्या माध्यमातून केला जातो. मग तुम्हाला जर तुमच्या फोनचे स्टोरेज वाचवायचे असेल तर त्याकरिता गुगल फोटोज किंवा इतर क्लाऊड स्टोरेज सेवेचा वापर करणे गरजेचे आहे.

त्यामुळे तुमच्या मोबाईलच्या स्टोरेजला बऱ्यापैकी खाली राहू शकते. आता अनेक मोबाईल कंपन्यांच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये क्लाऊड स्टोरेजची सुविधा देण्यात येत आहे.

दुसरे म्हणजे तुम्ही महत्त्वाच्या फाइल्स फोन ऐवजी सर्वरवर ठेवण्यासाठी क्लाऊड स्टोरेजचा वापर करू शकता. यामध्ये तुम्हाला काही क्लाऊड सेवाकरिता पैसे द्यावे लागतात.

2- तात्पुरत्या फाईल हटवणे मोबाईल मधील कॅशे मेमरी डिलीट करून देखील तुम्ही स्टोरेज कमी करू शकतात. याकरिता तुम्ही स्टोरेजमध्ये जाऊन ॲप्स उघडू शकता आणि कॅशे क्लिअर करू शकता.

कॅशे या तात्पुरत्या फाईलचा असतात व त्या फोनमध्ये स्टोरेज होत असतात. त्यामुळे फोनच्या स्टोरेजमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण कॅशे फाईल डिलीट करता येतात व स्टोरेज खाली  करता येतो.

3- क्लिनिंग ॲपचा वापर बरेच जण फोनच्या मेमरीमध्ये वाढ होत जाते त्या पद्धतीने अनेक युजर्स वेगवेगळ्या प्रकारचे क्लिनिंग ॲप्स वापरायला लागतात. परंतु त्या ऐवजी गुगलच्या फाइल्स बाय गुगल या एप्लीकेशनचा वापर करावा. हे ॲप क्लिनिंग ॲप म्हणून देखील काम करते.

यामध्ये अनेक डुप्लिकेट फाइल्स, जंक फाइल्स, मिम्स आणि अनेक लार्ज साईज फाइल्स इत्यादी अनेक गोष्टी एकत्रपणे दिसतात. याचा वापर करून तुम्ही भरपूर स्टोरेज कमी करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe