Solar Light: घरात वापरा हा सोलर लाईट आणि विज बिल करा कमी! ऑटोमॅटिक होतो चालू-बंद, वाचा किंमत

Published on -

Solar Light:-सौर ऊर्जेचा वापर आणि त्यावरील आधारित उपकरणांच्या वापराला सध्या प्रोत्साहन देण्यात येत असून हळूहळू सौर उर्जेवर आधारित उपकरणांचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आपल्याला माहित आहेस की, विजेचे दर देखील वाढले असल्यामुळे साहजिकच वाढीव वीज बिलाची समस्या प्रत्येकाला येते व आपल्या खिशावर त्याचा आर्थिक दृष्टिकोनातून खूप विपरीत परिणाम होतो.

त्यामुळे सोलर एनर्जी अर्थात सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर जेवढा जास्तीत जास्त प्रमाणात घरात केला तर विज बिल कमी ठेवण्यास किंवा शून्यावर आणण्यास  आपल्याला मदत होऊ शकते. तसेच सरकारांच्या माध्यमातून देखील विविध योजनातून अनुदान देऊन सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

या अनुषंगाने जर आपण घरातील वीज बिलाचा विचार केला तर प्रामुख्याने घरामध्ये आपण जे काही दिवे अर्थात लाईट लावतो त्याचा खूप मोठा परिणाम विज बिलांवर होत असतो. त्या ऐवजी जर आपण घरांमध्ये सोलर लाईटचा वापर केला तर नक्कीच विज बिल कमी होण्यास मदत होऊ शकते. याच पद्धतीने तुम्हाला देखील विज बिल कमी करायचे असेल तर बाजारामध्ये एक विशेष प्रकारचा सोलर लाईट विक्रीसाठी आला असून तो उत्तम प्रकाश देण्यासाठी सक्षम आहे व याच सोलर लाईट विषयी महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत.

 घरात लावा हा सोलर लाईट वीज बिल येईल कमी

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, तुम्हाला देखील घरामध्ये सोलर लाईट लावायचा असेल तर बाजारामध्ये एक विशेष सोलर लाईट विक्रीसाठी उपलब्ध झाला असून तो खूप चांगला प्रकाश देण्यासाठी सक्षम आहे. हा सोलर लाईट इतर सामान्य असणाऱ्या एलईडी लाईट पेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचा आहे.

हा सोलर लाईट तुम्ही टेरेसाच्या किंवा जिन्याच्या पायऱ्यावर देखील लावू शकतात किंवा घरामध्ये कुठेही त्याला लावू शकतात. त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही पायऱ्यांवर प्रकाशासाठी याचा वापर केला तर जेव्हा तुम्ही पायऱ्यांवरून चालता तेव्हा हा ऑटोमॅटिक चालू होतो व जेव्हा तुम्ही पायऱ्यांवर चालणे बंद केले तेव्हा ऑटोमॅटिक बंद होतो.

हा एकच सोलर लाईट उत्तम प्रकाशासाठी खूप महत्त्वाचा असून घरामध्ये जास्त लाईट लावण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. हा सोलर लाईट मोशन सेन्सर तसेच सोलर पॅनल आणि एक शक्तिशाली बॅटरी सोबत येतो. ही बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर कित्येक तास काम करते व सूर्यप्रकाशामध्ये सतत चार्ज होत राहते. त्यामुळे तुम्हाला परत परत चार्ज करण्याची गरज भासत नाही.

 किती आहे या सोलर लाईटची किंमत?

हा सोलर लाईट तुमच्या घरातील विज बिल कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो व याची फ्लिपकार्ट वर जर किंमत पाहिली तर ती साधारणपणे 2300 इतकी आहे. परंतु यावर सध्या ऑफर चालू असून तुम्हाला हा सोलर लाईट फक्त 1500 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News