अखेर प्रतीक्षा संपली! नवीन वर्षाच्या ‘या’ तारखेला लॉन्च होत आहे Oneplus 13! जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स

स्मार्टफोनच्या बाबतीत आजकालच्या तरुणाईच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांच्यामध्ये वनप्लस आणि आयफोन यांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून जे काही स्मार्टफोन लॉन्च केले जातात त्या स्मार्टफोनची आतुरतेने तरुणाई वाट पाहत असते.

Ajay Patil
Published:
oneplus 13 smartphone

Oneplus 13 Launch Date:- स्मार्टफोनच्या बाबतीत आजकालच्या तरुणाईच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांच्यामध्ये वनप्लस आणि आयफोन यांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून जे काही स्मार्टफोन लॉन्च केले जातात त्या स्मार्टफोनची आतुरतेने तरुणाई वाट पाहत असते.

त्यामुळे वनप्लस स्मार्टफोन प्रेमी जे असतील त्यांच्या करता ही नवीन वर्षाची सुरुवातच एक आनंदाची बातमी घेऊन आणि धमाकेदार स्वरूपात होणार आहे. कारण कित्येक दिवस प्रतीक्षा असलेला वनप्लसचा Oneplus 13 हा ब्रँड नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन 7 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी भारतामध्ये लॉन्च करणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रगत अशी फीचर्स देण्यात आली आहेत. जर आपण वनप्लस 13 ची वनप्लस 12 शी तुलना केली तर या नवीन स्मार्टफोनमध्ये अनेक सुधारणा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये हा स्मार्टफोन नक्कीच लोकप्रिय होईल अशी एक शक्यता आहे.

Oneplus 13 मध्ये काय आहे खास?
वनप्लस 13 मध्ये नवीन असे स्नॅपड्रॅगन 8 Elite चिपसेटचा वापर करण्यात आलेला आहे जो 40 टक्के अधिक सीपीयू परफॉर्मन्स सोबत जीपीयू आणि एआय कॅफेबिलिटीजमध्ये मोठी सुधारणा करतो. इतकेच नाही तर हाच नवीन स्मार्टफोन ऑक्सिजन ओएस 15 वर आधारित असून जे अँड्रॉइड पंधरा वर आधारित आहे.

या स्मार्टफोनमध्ये आधीची डिझाईन कायम ठेवण्यात आली असून वेगन लेदर फिनिशिंग आणि ग्लास व्हेरियंटचा पर्याय देण्यात आला आहे.तसेच या स्मार्टफोनचे पाणी व धुळीपासून संरक्षण करण्याकरिता याला IP69 रेटिंग असणार आहे.

तसेच वनप्लस 13 मध्ये डिस्प्ले हा फ्लॅट पद्धतीचा देण्यात आला असून त्यामध्ये एलटीपीओ पॅनल दिला आहे व यामुळे उच्च रीसोल्युशन आणि रिफ्रेश रेट मिळण्यास मदत होणार आहे. या सगळ्या डिस्प्लेच्या वैशिष्ट्यांमुळे विजुअल एक्सपिरीयन्स खूप चांगल्या पद्धतीचा मिळेल.

तसेच यामध्ये मिळणाऱ्या एक्वा टच फीचरमुळे ओली स्क्रीन असेल तरी देखील सहजपणे वापर करता येणार आहे. तसेच कॅमेरा सेटअपमध्ये देखील अनेक इम्प्रूमेंट करण्यात आले असून

यामध्ये 50 मेगापिक्सल टेलीफोटो सेंसर 3x ऑप्टिकल झूम व त्यासोबत 50 मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड लेन्स आणि Hasselblad ट्युनिंगचा समावेश असणार आहे. कॅमेराच्या या सगळ्या उत्कृष्ट अशा वैशिष्ट्यांमुळे उत्तम अशा फोटोग्राफीचा अनुभव युजर्सला मिळेल.

कशी असणार बॅटरी?
वनप्लस 13 मध्ये 6000mAh ची पावरफूल बॅटरी देण्यात आली असून जी दीर्घकाळ काम करेल व 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल व यामुळे हा स्मार्टफोन काही मिनिटात पूर्ण चार्ज होईल.

कधी होणार आहे लॉन्च?
Oneplus 13 हा स्मार्टफोन भारतामध्ये 7 जानेवारी 2025 रोजी रात्री नऊ वाजता लॉन्च होणार आहे व याची अधिकृत पुष्टी वनप्लसच्या वेबसाईटवरून करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe