Car Gadgets: कारमध्ये ‘ही’ गॅझेट असतील तर कितीही लांबचा प्रवास करा नाही येणार अडचण! वाचा माहिती

Published on -

Car Gadgets: आपल्याकडे जेव्हा कुठल्याही प्रकारचे वाहन असते त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे खूप गरजेचे असते. मग ती काळजी वाहनाच्या देखभाली संबंधी असो किंवा इतर महत्त्वाच्या वाहनाच्या संबंधित गोष्टींविषयी असो ती काळजी घेणे खूप गरजेचे असते.

जेव्हा आपण लांबच्या प्रवासाला निघतो तेव्हा बऱ्याचदा आपण गाडीची सर्विसिंग करून घेतो व त्यानंतरच लांबचा प्रवासाची योजना बनवत असतो. परंतु यासोबतच सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास खूप मोठ्या प्रमाणावर झाल्याने अशी काही उपकरणे आलेले आहेत

की जी तुम्हाला प्रवासामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मदत करू शकतात. तसेच अशी उपकरणे तुम्ही तुमच्या वाहनांमध्ये म्हणजेच कारमध्ये बसवली तर तुम्हाला प्रवास करताना अडचणी येत नाही. जर तुम्हाला स्वतःची कार घ्यायची असेल किंवा कार घेण्याचा विचार करत असाल

तर तुमच्या कारमध्ये ही काही महत्त्वाची गॅजेट्स असणे खूप गरजेचे आहे व अशा मुळे तुम्हाला प्रवास करत असताना जर अचानक काही प्रकारचे अडचणी आल्या तर त्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकतात.

 कारमध्ये बसवा ही गॅजेट्स आणि अडचणी विना करा प्रवास

1- डॅश कॅमेरा- जर तुम्ही तुमच्या कारमध्ये डॅश कॅम बसवले तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला मिळू शकतात. या डॅश कॅमेराच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण प्रवासाची नोंद म्हणजे रेकॉर्ड करू शकतात.

प्रवास करत असताना दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर त्या कॅमेऱ्यातील व्हिडिओ पुरावा म्हणून तुम्हाला वापरता येऊ शकतो. या दृष्टिकोनातून डॅश कॅम हे गॅझेट तुमच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचे असे आहे.

2- एअर कंप्रेसर/ टायर इन्फ्लेटर- हे गॅझेट देखील खूप महत्त्वाचे असून तुमच्या कार मध्ये हे असायलाच हवे. तुम्ही जर आमच्या प्रवासाला जात असाल व तुमच्या कार मध्ये जर बॅटरीवर चालणारे टायर इन्फ्लेटर किंवा एअर कॉम्प्रेसर असणे गरजेचे आहे.

तुम्ही प्रवास करत असताना कारच्या टायरच्या हवा अचानकपणे कमी झाली तर तुम्हाला हे गॅझेट खूप कामाला येऊ शकते. या गॅजेटची किंमत साधारणपणे दोन ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

3- मिनी एयर प्युरीरिफायर- आता अनेक कारचा मॉडेल्समध्ये एयर प्युरीरिफायर आधीच दिलेली असते. जर हे कारमध्ये नसेल तर तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता.

यामुळे तुमच्या कारमध्ये कुठल्याही स्वरूपाचा नकोसा असलेला वास येणार नाही. बाजारामध्ये जर तुम्हाला ते घ्यायचे असेल तर साधारणपणे दोन ते पाच हजार रुपये पर्यंत चांगले एयर पुरिफायर उपलब्ध आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News