सध्या बाजारामध्ये अगदी दहा हजारापासून ते अगदी लाखो रुपयांपर्यंत किमतीतले स्मार्टफोन बाजारात लॉन्च करण्यात आलेले आहेत. बरेचजण कितीही महागडा स्मार्टफोन राहिला तरी विकत घेतात. कारण बाजारामध्ये स्मार्टफोनची मागणी दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे व प्रत्येकाला आता नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी चा स्मार्टफोन हवा आहे.
परंतु जितका स्मार्टफोन टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेला असेल तेवढी त्याची किंमत जास्त असते व बरेच स्मार्टफोन हे सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे बरेच जण हे कमीत कमी किमतीत चांगली वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोनच्या शोधात असतात.
बजेटमध्ये मिळतील असे चांगले स्मार्टफोन पाहिले जातात व बाजारामध्ये देखील अशा स्मार्टफोनची संख्या मोठी आहे. समजा तुमचा बजेट जर 40,000 पर्यंत असेल तर आयफोनला फिके पाडतील असे उत्तम स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे या लेखात आपण अशा 40000 रुपयांपेक्षा कमी किमतीतले स्मार्टफोनची यादी बघणार आहोत.
हे स्मार्टफोन आहेत आयफोनला टक्कर देणारे
1- शाओमी 14 CIVI- शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाचा OLED देण्यात आला आहे व तो 2750×1236 पिक्सल रिझोल्युशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर वापरण्यात आला आहे व त्यासोबतच 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतचे स्टोरेज देण्यात आले आहे.
फोटोग्राफी करिता या स्मार्टफोनमध्ये Leica ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे व पन्नास मेगापिक्सलचा प्राइमरी, 50 मेगापिक्सल ची टेलीफोटो लेंस आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्राव्हाइड सेन्सर मिळतो. तसेच या फोनमध्ये सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा ड्युअल फ्रंट कॅमेरा मिळतो. या स्मार्टफोनची किंमत 39 हजार 999 रुपये आहे.
2- मोटोरोला Edge 50 Pro- या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यामध्ये प्रायमरी 50 मेगापिक्सल एआय कॅमेरा आहे तसेच नवीन फोटो इन्हान्समेंट इंजिन देखील देण्यात आलेली आहे.
तसेच ऑटो फोकस ट्रेकिंग, एआय अडपटीव्ह स्टेबलायझेशन, एआय फोटो इन्हासमेंट इंजिन यासारखे एआय पॉवर कॅमेरा फीचर्स मिळतील. याशिवाय अनेक वैशिष्ट्ये या फोनमध्ये देण्यात आलेले असून याची किंमत 31 हजार 999 रुपये आहे.
3- वनप्लस 12R- यामध्ये 6.78 इंचाचा AMOLED ProXDR डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिझोल्युशन 2780×1264 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. वनप्लस 12R फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला असून यामध्ये 16 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या स्टोरेज मिळेल. या स्मार्टफोनच्या आठ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल तुम्ही 37 हजार 999 मध्ये घेऊ शकतात.