iPhone 15 : जर तुम्हाला स्वस्तात iPhone 15 घ्यायचा असेल तर ही वेळ तुमच्यासाठी उत्तम आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट या फोनवर सध्या मोठा डिस्काऊंट देत आहे.
Apple ची iPhone 15 सीरीज गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देशात लॉन्च झाली होती. या मालिकेत iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश होता.
फ्लिपकार्ट 9 ते 15 फेब्रुवारी दरम्यान व्हॅलेंटाईन डे सेल ऑफर करत आहेत, या अंतर्गत त्याचा 128 GB व्हेरिएंट 79,900 रुपये, 256 GB व्हेरिएंट 89,900 रुपये आणि 512 GB व्हेरिएंट 1,09,900 मध्ये लॉन्च करण्यात आला.
या स्मार्टफोनचा 128 जीबी व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 12,901 रुपयांच्या डिस्काउंटसह 66,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. तर HDFC बँकेचे ग्राहक त्यांच्या क्रेडिट कार्डांवरून 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट घेऊ शकतात.
यासह, iPhone 15 ची किंमत 64,999 रुपये कमी होईल. याशिवाय सिटी बँक, एचएसबीसी, डीबीएस आणि बँक ऑफ बडोदाचे ग्राहक 10 टक्के अतिरिक्त सूट घेऊ शकतात. ही सूट 1,500 रुपयांपर्यंत आहे. यासोबत या स्मार्टफोनची किंमत 63,499 रुपये होईल. तसेच फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 3,300 रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे.
हा स्मार्टफोन पाच रंगात उपलब्ध आहे. यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे ज्याची कमाल ब्राइटनेस पातळी 2,000 nits पर्यंत आहे.
यात डायनॅमिक आयलंड फीचरही देण्यात आले आहे. iPhone 15 च्या ड्युअल रियर कॅमेरामध्ये 48-मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा आणि अल्ट्रा-वाइड लेन्ससह 12-मेगापिक्सलचा सेन्सर आहे. त्याच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 12-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.