रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवायची चिंता आहे? वापर करा ‘या’ पर्यायांचा आणि मिळवा रेल्वेचे कन्फर्म तिकीट

Ajay Patil
Published:
confirm ticket rule

भारतीय रेल्वे ही प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असल्याने लांबच्या प्रवासाकरिता रेल्वेला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे जाळे विकसित झालेले असून अजून पर्यंत ज्या भागांमध्ये रेल्वेचे जाळे विकसित नाही अशा भागांमध्ये देखील आता यावर काम सुरू आहे.

दररोज लाखोंच्या संख्येने रेल्वेच्या माध्यमातून प्रवासी प्रवास करत असतात. परंतु रेल्वेने प्रवास करताना बऱ्याचदा काही छोट्या-मोठ्या समस्या देखील येतात व त्यातील प्रमुख समस्या म्हणजे बऱ्याचदा आपल्याला प्रवास करायचा असतो व त्याकरिता अगोदरच आपण रेल्वेचे तिकीट बुक करून ठेवतो.

परंतु यामध्ये बऱ्याचदा अगोदर तिकीट बुक करून देखील रेल्वेचे तिकीट कन्फर्म होत नाही. यासाठी बरेच प्रयत्न केले जातात परंतु तरी देखील काही फायदा होत नाही. कधीतर आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की, प्रवासाची नियोजित तारखेच्या कितीही दिवस अगोदर आपण रेल्वेचे तिकीट बुकिंग केलेले असते.

परंतु आपली प्रवासाची तारीख येऊन जाते तरीदेखील तिकीट कन्फर्म होत नाही व वेळेवर खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते. परंतु आता या समस्येपासून जर मुक्तता हवी असेल तर काही सोप्या पर्यायांचा वापर करून तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये कन्फर्म तिकीट मिळवू शकतात.

 रेल्वेची विकल्प योजना करेल मदत

भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून 2015 मध्ये विकल्प योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती व ही योजना सुरू करण्यामागे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळावे हा उद्देश होता.  या योजनेच्या माध्यमातून प्रवाशांना शक्य होईल तितक्या लवकर कन्फर्म तिकीट देण्याचा रेल्वे कडून प्रयत्न केला जातो.

या विकल्प योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन वेटिंग तिकीट बुक करताना प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी दुसऱ्या ट्रेनचा पर्याय देखील निवडण्याची संधी मिळते. जेव्हा आपण रेल्वेचे तिकीट ऑनलाईन पद्धतीने बुक करतो तेव्हा आपल्याला विकल्प हा पर्याय आपोआप त्या ठिकाणी सुचवला जातो.

तुम्हाला जर एखाद्या ट्रेनमध्ये वेटिंग तिकीट मिळाले असेल तर तुम्हाला त्या ट्रेन शिवाय त्या मार्गावर जाणाऱ्या दुसऱ्या इतर ट्रेन निवडण्यास देखील सांगितले जाते. यामध्ये प्रवाशांनी निवडलेल्या ट्रेनमध्ये आपोआप सीट देण्यात येते.

विकल्प या योजनेच्या माध्यमातून तुम्ही सात ट्रेनची निवड करू शकतात. या योजनेद्वारे तुम्हाला शंभर टक्के कन्फर्म तिकीट मिळेल असे नाही. परंतु हा पर्याय निवडल्यानंतर कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता मात्र वाढते.

 रेल्वेचे हे ॲप्लिकेशन करेल मदत

कन्फर्म तिकीट मिळण्यामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या डोळ्यासमोर ठेवून आयआरसीटीसीने Confirmtkt हे ॲप्लिकेशन लॉन्च केले असून अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन वापरता येते. इंग्रजी व हिंदी सह इतर अनेक भाषांमध्ये हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे

या एप्लीकेशनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला प्रत्येक ट्रेनमधील वेगवेगळ्या सीट तपासायची गरज भासत नाही. तुम्ही एकदा सर्च केले की तुम्हाला त्या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांमधील उपलब्ध असलेल्या सिटची माहिती मिळते.

जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्ही जास्तीचे पैसे देऊन तिकीट बुक करण्याचा पर्याय यामध्ये निवडू शकता. परंतु या माध्यमातून तिकीट बुक करायचे असेल तर तुमच्याकडे आयआरसीटीसी लॉगिन आयडी असणे गरजेचे आहे.

 तात्काळ तिकीट बुकिंगचा पर्याय

तुम्हाला जर तात्काळ तिकीट बुकिंग करायची असेल तर एसी करिता सकाळी दहा वाजता आणि स्लीपर करिता सकाळी 11 वाजता ही बुकिंग सुरू होते. या पद्धतीने तुम्ही ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी देखील तिकीट बुकिंग करू शकतात.

काही आपत्कालीन परिस्थिती असेल व तुम्हाला इमर्जन्सी प्रवास करायचा असेल तर तुम्ही प्रीमियम तात्काळ तिकीट बुकिंग चा पर्याय वापरू शकतात. परंतु यामध्ये तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागू शकतात.

 मेक माय ट्रिपचा ट्रिप गॅरंटी प्रोग्राम करेल मदत

यासाठी मेक माय ट्रिप देखील प्रवाशांना मदत करते व मेक माय ट्रिपने कन्फर्म तिकीट बुकिंग करिता ट्रिप गॅरंटी प्रोग्राम सुरू केला असून यामध्ये समजा जर ट्रेन पूर्ण भरलेली असेल तर प्रवाशांना 60 किलोमीटरच्या परिघामध्ये येणाऱ्या कुठल्याही रेल्वे स्टेशनवरून बुकिंग करता येऊ शकते.

यामध्ये चार्ट तयार होण्यापूर्वी जर तुम्ही तिकीट रद्द केले तर कंपनी पूर्ण रिफंड देखील देते. यामध्ये विशेष असे आहे की जर रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही तर यामध्ये फ्लाईटचा पर्याय देखील देण्यात आला आहे. एवढेच नाही तर कॅब आणि बसचा पर्याय देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे.

या प्रोग्राममध्ये मेक माय ट्रिप प्रवाशाला ट्रॅव्हल वाउचर देखील देते व याचा वापर करून प्रवाशांना प्रवासातील अतिरिक्त खर्च टाळता येऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe