तुम्ही देखील iPhone वापरता का? बॅटरी लाईफ वाढवायची असेल तर अँप्पलने सांगितलेल्या ‘या’ टिप्स वापरा! होईल फायदा

Ajay Patil
Published:
iphone care tips

आजकाल आपल्याला प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसून येतो. यामध्ये विविध कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात असून प्रत्येकजण त्याच्या त्याच्या आवडीनुसार स्मार्टफोनची निवड करत असतात. परंतु या सगळ्यांमध्ये एप्पल यूजरची संख्या मोठी आहे.

आयफोन हे किमतीने महाग जरी असले परंतु त्यांचे नवनवीन आकर्षक फीचर्स ग्राहकांना आकर्षित करतात. परंतु उपकरण कुठलेही असले तरी त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे खूप गरजेचे असते तरच त्याची लाईफ सुधारते. असेच कुठल्याही कंपनीच्या स्मार्टफोनचा आहे.

स्मार्टफोनच्या बाबतीत फोनची बॅटरी खूप महत्त्वाची असते व तिची लाईफ कमी न होता ती टिकवून ठेवणे देखील तेवढेच गरजेचे असते. आपल्याला अनुभव असेल की जसं जसं आपण मोबाईल  वापरत असतो व काही कालावधीनंतर तो जुना होतो तशी त्याची बॅटरीची लाईफ देखील कमी व्हायला लागते.

अगदी याप्रमाणे आयफोनची बॅटरीची देखील समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्हाला जर आयफोनची बॅटरीची लाईफ टिकवून ठेवायची असेल किंवा तिच्यात सुधारणा करायची असेल तर एप्पल कंपनीने सांगितलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स आपण जाणून घेऊ.

 या टिप्स वापरा आणि आयफोनची बॅटरी लाइफ सुधारा

1- आयफोन सतत अपडेट करणे सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या आयफोनला नवीन iOS आवृत्तीसह अपडेट ठेवणे खूप गरजेचे आहे. अपडेट फोनमध्ये नवनवीन फीचर्स आणत नाहीतर महत्वपूर्ण फिक्सेस देखील आणतात व याचा सकारात्मक परिणाम बॅटरी लाईफवर होतो. तुम्ही आयफोन iOS च्या नवीन आवृत्तीसह अपडेट करून आयफोनची बॅटरी लाईफ आणि एकूण संपूर्ण डिव्हाइसची कार्यक्षमता सुधारू शकतात.

2- आयफोन कूल ठेवणे आयफोन साधारणपणे 16 अंश आणि 22 सेंटीग्रेड  तापमानामध्ये उत्तम काम करण्याला समर्थ असतो. त्यामुळे तुमच्या आयफोनचे तापमान 35 सेंटीग्रेड पेक्षा जास्त ठेवल्यास बॅटरीचे नुकसान होऊ शकते.

या उलट जर तुम्ही थंड वातावरणामध्ये डिवाइस वापरला तर त्यामुळे बॅटरी लाइफ टिकून राहते. त्यामुळे बॅटरी लाईफ सुधारायची असेल व त्याचे नुकसान टाळायचे असेल तर डिवाइस 32° च्या खाली थंड आणि कोरड्या वातावरणात ठेवणे गरजेचे आहे.

3- चार्जिंग करताना कव्हर लावू नका इतर स्मार्टफोन असो किंवा आयफोन असो हे जेव्हा आपण चार्जिंग लावलेले असतात तेव्हा ते गरम झाल्याचे आपल्याला दिसून येते. यामुळे बॅटरीवर नकारात्मक परिणाम होऊन ते लवकर खराब होण्याची शक्यता वाढते.

समजा तुम्ही मोबाईल चार्ज लावलेला आहे व तो गरम झाल्याचे दिसून आले तर लगेच आयफोनचे कव्हर काढून टाकणे गरजेचे आहे. हा उपाय केल्यामुळे बॅटरीचे लाईफ दीर्घकाळ टिकते.

4- फोन कमीत कमी 50 टक्के चार्ज करणे बॅटरी जर तुम्हाला जास्त कालावधी करिता टिकवून ठेवायचे असेल तर ज्या दिवशी सुट्टी असेल किंवा काही काम नसेल त्या दिवशी आयफोनची बॅटरी सुमारे 50 टक्के चार्ज झाली असल्याची खात्री करावी. अशावेळी पूर्ण चार्ज झालेला किंवा पूर्णपणे डिस्चार्ज झालेल्या बॅटरीसह आयफोनचा वापर करणे टाळावे.

5- लो पॉवर मोड चालू करणे ॲपल कंपनीने iOS 9 सह लो पावर मोड सादर केला असून हे फिचर डिस्प्ले ब्राईटनेस  कमी करून, त्यासोबत ॲनिमेशन कमी करून आणि बॅकग्राऊंड ॲप रिफ्रेश करून बॅटरी लाइफ सुधारण्यासाठी खूप मोठी मदत करते.

जेव्हा बॅटरी 20 टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर पोहोचतोय तेव्हा लो पॉवर मोड ऑन केला जातो. तसेच तुम्ही आयफोनच्या सेटिंगमध्ये बॅटरीवर टॅप करून देखील ही सेटिंग इनेबल करू शकता. फोन चार्ज झाल्यानंतर हा मोड ऑटो स्विच ऑफ होतो.

अशाप्रकारे या साध्या गोष्टींवर लक्ष ठेवले तरी तुमच्या आयफोनची बॅटरी लाइफ सुधारते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe