घरामध्ये तुम्हाला 24 तास वेगात इंटरनेट हवे आहे का? याकरिता एअरटेलची निवड कराल की जिओची? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
jio and airtel fiber

सध्या डिजिटल आणि इंटरनेटचे युग असून याकरिता स्पीड अर्थात वेगवान इंटरनेट सुविधा असणे खूप गरजेचे आहे. बरीच कामे आता इंटरनेटच्या साह्याने पूर्ण केली जातात त्यामुळे वेगात चालणाऱ्या इंटरनेटची खूप आवश्यकता आहे. आपल्याला माहित आहेच की, एअरटेल आणि जिओ या टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रत्येक बाबतीत मोठी स्पर्धा असून ती इंटरनेटच्या बाबतीत देखील आहे.

परंतु जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये 24 तास इंटरनेट हवे असेल व ते देखील वेगात तर तुम्हाला एअरटेल फायद्याचे ठरते की जीओ हे देखील माहिती असणे तितकेच गरजेचे आहे. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये 24 तास स्पीडी इंटरनेट करिता एअरटेल व जिओ यापैकी कोणते चांगले राहील? याबाबतची माहिती थोडक्यात घेणार आहोत.

 घरात 24 तास इंटरनेटसाठी एअरटेल चांगले की जीओ

आपल्याला माहित आहे की आता बाजारामध्ये एअर फायबर उपकरणे आली असून तुम्ही वायरशिवाय इंटरनेट वापरू शकणार आहात. ही उपकरणे तुम्ही घरात कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता व या उपकरणांच्या साहाय्याने तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकणार आहात. एअरटेल कडून एअरटेल एक्स्ट्रीम एअर फायबर लॉन्च करण्यात आलेले आहे.परंतु अजून पर्यंत जिओच्या माध्यमातून  जिओ एअर फाइबरची लॉन्चिंग करण्यात आलेले नाही.

याबाबतीत जिओ  कंपनीच्या एजीएम बैठक नुकतीच पार पडली व यामध्ये जिओ एअर फायबरचे लॉन्च करण्याची तारीख जाहीर करण्यात आली असून हे उपकरण 18 सप्टेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी माहिती समोर आलेली आहे. याबाबतीत जिओने म्हटले आहे की इतर उपकरणांपेक्षा जिओचे एअर फाइबर हे 20 टक्के स्वस्त असणार आहे. परंतु अजून पर्यंत तरी जिओ एअर फायबरचे इंटरनेट प्लॅन कसे आहेत याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु एअरटेलने मात्र लॉन्च केलेले आहेत.

 एअरटेल एक्स्ट्रीम एअर फायबरचे प्लान

एअरटेलने त्यांच्या एअर फायबरचे प्लान लॉन्च केले असून एअरटेल एक्स्ट्रीम एअर फायबरच्या सहा महिन्याच्या प्लॅनची किंमत 7733 रुपये असून यामध्ये 2500 रुपयांची डिवाइस सिक्युरिटी आहे जी तुम्हाला रिफंडेबल आहे. या सहा महिन्याच्या प्लानमध्ये तुम्हाला 100Mbps इतका इंटरनेट स्पीड मिळणार आहे व तुम्हाला वाय-फाय 6 टेक्नॉलॉजी देखील या माध्यमातून मिळणार आहे. यामुळे तुम्हाला फास्ट इंटरनेट आणि डाऊनलोडिंग स्पीड देखील मिळणार आहे.

 जिओ एअर फाइबर अशा पद्धतीने होऊ शकते लॉन्च?

जर आपण इटीचा रिपोर्ट पाहिला तर त्यानुसार जिओ त्यांचे जिओ एअर फायबर सहा हजार रुपयांमध्ये लॉन्च करू शकते अशी एक शक्यता असून एअरटेल पेक्षा हा प्लॅन स्वस्त असेल असे देखील म्हटले जात आहे. या उपकरणाबाबत जिओचे म्हणणे आहे की, त्यांचे हे डिवाइस एअरटेलच्या जे काही नॉन स्टॅन्ड अलोन तंत्रज्ञान आहेत

त्यापेक्षा उत्तम असणार आहे कारण जिओ कंपनीने यामध्ये स्टॅन्ड अलोन म्हणजेच एसए तंत्रज्ञानाचा वापर केला असून ते 5G नेटवर्क उत्तम पद्धतीने वापरते व या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कनेक्टिव्हिटी आणि उत्तम स्पीड देखील मिळणार आहे. यामध्ये जिओने 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड वाढवला जाईल असे देखील सांगितले आहे. परंतु अद्याप पर्यंत जिओच्या योजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत. परंतु याबाबतचे स्पष्टता 18 सप्टेंबर रोजी येऊ शकते. त्याचवेळी वापरकर्त्यांना जिओची निवड करावी की एअरटेलची याबाबत सुस्पष्टता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe