Jio Vs Airtel Recharge Plan : जिओ आणि एअरटेल या देशातील प्रमुख दोन टेलिकॉम कंपन्या आहेत. मात्र जिओची एअरटेलपेक्षा अधिक ग्राहक संख्या आहे. विशेष म्हणजे जिओची ग्राहक संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिओ आणि एअरटेलकडून आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले गेले आहेत.
यात वेगवेगळे स्वस्त आणि महाग रिचार्ज प्लॅन समाविष्ट आहेत. दरम्यान आज आपण जिओच्या आणि एअरटेलच्या 666 रुपयांच्या प्लॅन विषयी माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर जिओ आणि एअरटेलकडून 666 रुपयांचा एक लॉन्ग टर्म व्हॅलिडीटी असलेला प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे.
या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना वेगवेगळे लाभ मिळत आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डाटा देखील दिला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या दोन्ही प्लॅनची तुलना करणार आहोत. यापैकी कोणता प्लॅन ग्राहकांसाठी फायदेशीर आहे याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
जिओचा 666 रुपयांचा प्लॅन कसा आहे
जिओ कंपनीचा हा प्लॅन 84 दिवसाच्या व्हॅलिडीटीसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली दीड जीबीचा डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना 126 जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळते. तसेच डेली शंभर एसएमएस देखील मिळतात. त्याशिवाय जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ सावन, जिओ मीट यांचे सबस्क्रीप्शन देखील मोफत मिळते.
एअरटेलचा 666 रुपयांचा प्लॅन कसा आहे
एअरटेल कंपनीचा हा प्लॅन 77 दिवसांच्या व्हॅलिडीटीचा आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली दीड जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅन सोबत जवळपास 115.5 जीबीचा डेटा मिळतो. अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळते. दिवसाला शंभर SMS देखील मिळतात.
कोणता प्लॅन बेस्ट
आम्ही दोन्ही प्लॅनची माहिती तुम्हाला दिली आहे. यावरून जिओचा प्लॅन हा बेस्ट असल्याचे दिसत आहे. कारण की जिओच्या प्लॅनची व्हॅलिडीटी सात दिवस अधिक आहे. यामुळे जर तुम्हाला जास्तीची व्हॅलिडीटी आवश्यक असेल तर तुम्ही हा प्लॅन सिलेक्ट केला तर काही हरकत नाही.