सध्या स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळे वैशिष्ट्य असलेले आणि परवडणाऱ्या किमतींपासून तर काही लाखो रुपयांपर्यंत किंमत असलेले स्मार्टफोन लॉन्च केलेले असून ग्राहक हे त्यांच्या बजेट आणि आवडीनुसार आता स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
परंतु बरेच जण स्मार्टफोन खरेदी करण्याअगोदर मात्र कमीत कमी किमतीत चांगली वैशिष्ट्ये असलेल्या स्मार्टफोन आपल्याला कसा मिळेल या दृष्टिकोनातून विचार करत असतो व तुम्ही देखील असाच विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. कारण विवो या कंपनीचे स्मार्टफोन लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत
व याच कंपनीने Vivo T3 Lite 5G कमीत कमी किमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून तुम्हाला जर हा फोन कमी किमतीमध्ये खरेदी करायचा असेल तर तुम्हाला फ्लिपकार्टवर चांगली डील मिळू शकते.
स्वस्तामध्ये मिळेल Vivo T3 Lite 5G स्मार्टफोन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विवो स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या उत्तम अशा डील पाहिला तर यामध्ये विवो वर सध्या ग्राहकांना Vivo T3 Lite 5G स्मार्टफोन चांगल्या किमतीमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी दिली जात असून हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवर परवडणाऱ्या डील मध्ये खरेदी करू शकतात.
विशेष म्हणजे या ऑफर अंतर्गत 9999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत तुम्ही याला खरेदी करू शकतात. विवो या कंपनीने या फोनला सर्वात स्वस्त फोन म्हटले असून यामध्ये अनेक वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे एचडीएफसी कार्डच्या माध्यमातून जर हा फोन तुम्ही खरेदी केला तर तुम्हाला पाचशे रुपयांची झटपट सूट देखील मिळते. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या फोनसह विवो चार्जर खरेदीवर देखिल दहा टक्क्यांची सूट दिली जाईल.
काय आहेत या फोनची वैशिष्ट्ये?
विवोच्या या बजेट फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 840nits ब्राईटनेस 6.56 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1612× 720 पिक्सेल रिझोल्युशनसह येतो. या स्मार्टफोनमध्ये सहा जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व त्यासोबत ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे.
तसेच या फोनची रॅम वर्चुअल मोडद्वारे सहा जीबी पर्यंत तुम्ही वाढवू शकतात. हा फोन ड्युअल 5ग कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येतो. तसेच सुरक्षिततेकरिता यामध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा
आणि त्यामध्ये दोन मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करिता फोनच्या समोर आठ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. पावरकरिता या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून या बॅटरीचे धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी आयपी 64 रेटिंग मिळाले आहे.