Tecno Pop 9 5G Smartphone:- स्मार्टफोन जर कोणाला घ्यायचा असेल तर प्रत्येक जण कमीत कमी बजेटमध्ये उत्कृष्ट अशी वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन आपल्याला मिळेल ही अपेक्षा बाळगून स्मार्टफोन शोधत असतात. स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये जर आपण बघितले तर अनेक प्रकारचे बजेट सेगमेंटमध्ये स्मार्टफोन आपल्याला पाहायला मिळतात या प्रत्येक कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला वेगवेगळी वैशिष्ट्ये दिसून येतात.
त्यामुळे स्मार्टफोन निवडताना खूप मोठा गोंधळ उडतो. जर तुम्हाला देखील दहा हजार रुपयांच्या बजेटमध्ये 5G कनेक्टिव्हिटी आणि 48 मेगापिक्सल कॅमेरा व 12 जीबी पर्यंत रॅम असलेला फोन हवा असेल तर या लेखामध्ये आपण अशा फोनची माहिती घेणार आहोत
ज्यामध्ये ही तीनही वैशिष्ट्ये तुम्हाला पाहायला मिळतील व या फोनचे नाव आहे टेक्नो पॉप 9 5G(Tecno Pop 9 5G)स्मार्टफोन होय. या स्मार्टफोन बद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.
किती आहे भारतात या स्मार्टफोनची किंमत?
तुम्हाला या टेक्नो स्मार्टफोन चा चार जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 9499 रुपयांना मिळेल व हा फोन तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन वरून खरेदी करू शकतात.
काय आहेत या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये?
1- कसा आहे डिस्प्ले?- या परवडणाऱ्या 5G स्मार्टफोन मध्ये 120 Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.6 इंचाचा एलसीडी पॅनल डिस्प्ले मिळतो.
2- चिपसेट- या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्शन 6300 चिपसेट वापरण्यात आला असून या 5G स्मार्टफोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी हा चिपसेट खूप फायद्याचा ठरतो.
3- किती आहे रॅम?- कंपनीने या स्मार्टफोनमध्ये चार जीबी रॅम दिली आहे व असे असले तरी आठ जीबी व्हर्चुअल रॅमच्या मदतीने तुम्ही 12 जीबी पर्यंत ही रॅम एक्सपांडेबल म्हणजेच वाढवू शकतात.
4- कसा आहे कॅमेरा?- कंपनीने यास फोनच्या मागच्या बाजूला 48 मेगापिक्सल Sony AI सेन्सर कॅमेरा दिला आहे तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगकरिता फोनच्या समोर आठ मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे.
5- कशी आहे बॅटरी?- या स्मार्टफोनमध्ये उत्तम पावर बॅकअप करिता कंपनीने 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली असून जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
6- इतर वैशिष्ट्य काय आहेत?- या स्वस्त असलेल्या 5G स्मार्टफोन मध्ये तुम्हाला NFC सपोर्ट देखील मिळतो व याशिवाय उत्कृष्ट आवाजाकरिता डुएल डॉल्बी ॲटमॉस स्पीकर्स देण्यात आले आहेत.