Kitchen Security Tips: स्वयंपाक घरातील गॅसचा पाईप असतो महत्त्वाचा! ‘या’ ॲपच्या मदतीने तपासा गॅस पाईपची एक्सपायरी डेट

Ajay Patil
Published:
gas pipe

Kitchen Security Tips:- गॅसमुळे आता स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करताना महिलांना फार मोठा दिलासा मिळाला असून जवळजवळ आता मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक घरात गॅस सिलेंडरचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो. परंतु गॅस सिलेंडरच्या बाबतीत सुरक्षितता जोपासणे व त्या पद्धतीने बारीक सारीक गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

बऱ्याचदा आपण वर्तमानपत्रांमध्ये किंवा सोशल मीडियावर  बातम्या ऐकतो किंवा वाचतो की गॅस गळतीमुळे अनेक ठिकाणी स्फोट झाल्याच्या घटना घडतात व यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी देखील होते. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना होऊ नयेत याकरिता आपण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून  गॅस सिलेंडरच्या बाबतीत काही बारीक सारीक गोष्टींची काळजी घेणे हे अतिशय गरजेचे आहे.

कारण गॅस सिलेंडरच्या बाबतीतली थोडीशी चूक जीवावर बेतू शकते. जर आपण गॅस सिलेंडरच्या बाबतीत पाहिली तर यामध्ये गॅस पाईपचे महत्त्व सर्वात जास्त आहे व हा रबरी पाईप असतो.

त्यामुळे काही कालावधीनंतर हा गॅस पाईप थोड्याफार प्रमाणात खराब होण्याचा धोका वाढतो व यामधून गॅस गळती होऊ शकते. त्यामुळे गॅस पाईप वर व्यवस्थित लक्ष ठेवणे किंवा त्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यासंबंधीची माहिती आपण या लेखात बघू.

 या पद्धतीने तपासा गॅस पाईपची एक्सपायरी डेट

गॅस पाईप रबरी असतो व काही कालावधीनंतर तो खराब होतो. जर आपण याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्यातून गॅस गळती होऊ शकते व आग तसेच गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते. म्हणून गॅस पाईप अगदी वेळेमध्ये बदलणे अतिशय गरजेचे आहे.

त्यामुळे गॅस पाईपची मुदत संपली आहे की नाही हे वेळोवेळी तपासत राहणे महत्त्वाचे आहे व ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात. तुम्हाला माहीत नसेल की गॅस पाईप वर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. तसे पाहायला गेले तर ही पाईपच्या परवान्याची तारीख असते व ती गॅस पाईप वर लिहिलेली दिसते.

या गॅस पाईपची एक्सपायरी डेट तुम्हाला तपासायचे असेल तर तुम्ही भारतीय मानक ब्युरोने विकसित केलेले बीआयएस केअर(bis care) एप्लीकेशन ची मदत घेऊ शकतात.

हे ॲप्लिकेशन तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा एप्पल ॲप स्टोअर वरून डाऊनलोड करू शकतात. याच्या मदतीने जर तुम्हाला गॅस पाईपची एक्सपायरी डेट तपासायची असेल तर ती तपासण्यासाठी तुम्हाला…

1- सुरुवातीला बीआयएस केअर अँप उघडावे लागेल.

2- त्यानंतर यामध्ये व्हेरिफाय लायसन्स डिटेल्स या पर्यायावर टॅप करावे लागेल.

3- त्यानंतर पाईप वर लिहिलेला CM/L कोड टाकावा.

4- हा कोड टाकल्यानंतर गो या बटणावर क्लिक करावे.

5- त्यानंतर लगेच तुम्हाला गॅस पाईप वरची तारीख दिसते.

अशा पद्धतीने तुम्ही गॅस पाईपची एक्सपायरी डेट तपासू शकतात व वेळेत गॅस पाईप बदलू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe