रिमोट वरून भावा बहिणींमध्ये किंवा घरातील कुटुंबामध्ये बऱ्याचदा भांडण झाल्याचे आपण पाहतो. जेव्हा आपण सगळे कुटुंब टीव्ही पाहत असतो तेव्हा प्रत्येक जण आपापल्या आवडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रयत्नशील असतो व याकरिता रिमोटच्या माध्यमातून जो तो चॅनेल बदलवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो.
ज्याच्या हातात रिमोट त्याचा संपूर्ण कंट्रोल हा टीव्हीवर असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हे झाले टीव्हीचा रिमोटच्या बाबतीत. परंतु घरामध्ये जर एसी असेल तर एसीला देखील रिमोट असतो व या रिमोटच्या साह्याने आपण एसी कंट्रोल करत असतो.
परंतु बऱ्याचदा एसीचा रिमोट खराब होतो किंवा हरवतो अशावेळी मोठी समस्या निर्माण होते.परंतु अशावेळी काळजी करण्याची गरज नसून तुमच्या हातातील स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही तुमचा एसी नियंत्रित म्हणजेच ऑपरेट करू शकता. याची महत्त्वाची पद्धत असून ती माहीत असणे गरजेचे आहे.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये आयआर ब्लास्टर आवश्यक
यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक स्मार्टफोनचा वापर तुम्ही एसी रिमोटसाठी करू शकत नाही. म्हणजेच काही ठराविक स्मार्टफोनचा वापर तुम्हाला रिमोट प्रमाणे करता येऊ शकतो. कारण स्मार्टफोनचा वापर रिमोट प्रमाणे करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये आयआर ब्लास्टर असणे गरजेचे आहे व ही सुविधा आता बऱ्याच स्मार्टफोनमध्ये देण्यात येते.
या फीचरच्या साह्याने तुम्ही स्मार्टफोनचा वापर रिमोट प्रमाणे करू शकतात. तुमच्या स्मार्टफोन मध्ये आयआर ब्लास्टर नसेल तर तुम्ही यासाठी आवश्यक असणाऱ्या ॲप किंवा सॉफ्टवेअरचा वापर करू शकत नाही.
अशाप्रकारे करा मोबाईलचा वापर रिमोटप्रमाणे
1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला जर तुमचा मोबाईलचा वापर रिमोटप्रमाणे करायचा असेल तर तुमच्या फोनमध्ये आयआर ब्लास्टर आहे का याची अगोदर खात्री करून घेणे गरजेचे आहे.
2- जर असेल तर त्यानंतर आयआर युनिव्हर्सल रिमोट किंवा या प्रकारच्या अन्य एप्लीकेशन प्लेस्टोर वरून डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
3- आज-काल कित्येक ब्रँडचे स्वतःचे अप्लिकेशन देखील उपलब्ध आहेत. याकरिता प्ले स्टोअर वर एसीच्या कंपनीचं नाव टाईप करून तुम्ही एप्लीकेशन शोधू शकतात.
4- त्यानंतर एप्लीकेशन ओपन करावे आणि आयआर रिमोट हा पर्याय निवडून त्यानंतर एसी हा पर्याय निवडावा.
5- त्यानंतर तुम्हाला एसीच्या ब्रँडची यादी त्या ठिकाणी दिसते व त्या ठिकाणी तुमचा एसी कोणत्या ब्रँडचा आहे त्याची निवड करावी. समजा एखाद्या वेळेस आलेल्या यादीमध्ये तुमचा एसी नसेल तर तुम्ही दुसरे एप्लीकेशन यासाठी ट्राय करणे गरजेचे आहे.
6- त्यानंतर तुम्ही तुमचा स्मार्टफोन एसीकडे पॉईंट करावा व मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला रिमोट प्रमाणे एसी कंट्रोल करण्याचे पर्याय दिसतील.
अशाप्रकारे तुम्ही तुमचा स्मार्टफोनचा वापर एसी रिमोट प्रमाणे करू शकतात.