Cyclone Update: अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस पडेल काय? वाचा काय म्हणतात हवामान तज्ञ?

Ajay Patil
Published:
cyclone update

Cyclone Update:- मान्सूनने यावर्षी भारतातील काही राज्य सोडली तर संपूर्ण भारतात पावसाच्या बाबतीत निराशा केलेली आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा विचार केला तर अगोदरच सुरुवात खूप उशिराने झाली आणि जून महिना पूर्ण कोरडा गेला. परंतु जुलै महिन्यात बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस बरसला आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा मात्र पावसाने मोठा खंड दिला व त्यानंतर सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना थोडेफार जीवदान मिळाले व पिण्याच्या पाण्याची समस्या देखील कमी होण्यास मदत झाली.

आता मान्सून परतीच्या प्रवासाला लागला असून  आता पाऊस येईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल अशी सध्या स्थिती आहे. परंतु यामध्येच आता बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती तयार झाली असून लक्षद्वीप बेटांच्या पश्चिमेकडे चक्राकार वारे तयार झाले आहेत.

त्यामुळे 21 ऑक्टोबर रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असून या चक्रीवादळाला तेज असे नाव देण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर या चक्रीवादळामुळे राज्यावर काही परिणाम होईल का किंवा पाऊस पडेल का? इत्यादी बाबत हवामान तज्ञांनी काय माहिती दिली? हे पाहणार आहोत.

 या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल?

अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या हे चक्रीवादळ साधारणपणे 26 ऑक्टोबर नंतर ओमानच्या दिशेने जाणार असून दक्षिण पाकिस्तानमध्ये देखील जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या तयार झालेल्या चक्रीवादळाचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही असे पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

अरबी समुद्रामध्ये जे चक्रीवादळ तयार झाले आहे ते दक्षिण बांगलादेशच्या दिशेने निघून जाण्याची दाट शक्यता आहे व त्यानंतर ते ओमानकडे सरकेल अशी देखील शक्यता आहे व त्यामुळे महाराष्ट्रावर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे देखील सांगण्यात आले आहे. सध्या राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये काही ठिकाणी उकाडा जाणवत असून कालपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील आहे.

तसेच पुणे हवामान विभागाने अंदाज व्यक्त करताना म्हटले आहे की पुणे परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच ऑक्टोबर हिटचा परिणाम पुणे शहरावर जाणवत असून पुणे शहराचे तापमान 35 अंश डिग्री सेल्सिअसच्या आसपास असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe