Maharashtra Havaman Andaj : 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार पाऊसमान कसे राहणार ? या संदर्भात भारतीय हवामान खात्याकडून मोठी अपडेट समोर येत आहे. खरंतर, गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत आहे.
पण, त्याआधी जवळपास 8-9 दिवस पावसाने दडी मारली होती. यामुळे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमधील शेतकरी हवालदिल झाले होते. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे त्या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढत होती. मात्र आता राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

दरम्यान हवामान खात्याने आज पासून पुढील चार-पाच दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज तर महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असून या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून संपूर्ण महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
24 ऑगस्ट पर्यंत कसे राहणार पाऊसमान
21 ऑगस्ट : आज कोकणातील सात, मध्य महाराष्ट्रातील 11, मराठवाड्यातील आठ आणि विदर्भातील 11 अशा एकूण 36 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून या पार्श्वभूमीवर सर्वच्या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
22 ऑगस्ट : संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट मिळाला आहे.
23 ऑगस्ट : विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
24 ऑगस्ट : कोकणातील रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये 24 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या 13 जिल्ह्यांना 24 ला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
- शिर्डी जवळील खाणीत पुन्हा मृतदेह ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
- Mahashivratri 2025 : भगवान शंकराच्या कृपेने ‘या’ 5 राशींचं नशीब झपाट्याने बदलणार – जाणून घ्या तुमची राशी आहे का?
- Shani Gochar 2025 : शनीदेवाचा आशीर्वाद ! ३० दिवसांत ‘या’ राशींना करिअर, पैसा आणि यश मिळणार
- पारनेरच्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी संघर्ष ! पुणे जिल्ह्यात अतिरिक्त पाणी, इथे कोरडे कालवे
- त्या अधिकाऱ्याचा शाहिस्तेखान करून टाका ! त्याशिवाय धर्म टिकणार नाही – आमदार संग्राम जगताप