Maharashtra Monsoon News : आजचा दिवस देशातील शेतकऱ्यांसाठी विशेष आनंदाचा आहे. खरतर, खरीप हंगाम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. अशातच खरीप हंगामासाठी महत्त्वाच्या अशा दोन गुड न्युज शेतकऱ्यांसाठी आल्या आहेत. पहिली गुड न्यूज आली आहे ती केंद्र शासनाकडून.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्र शासनाने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून खरीप हंगाम 2023-24 साठी हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज खरीप हंगामासाठी हमीभावाची घोषणा करण्यात आली आहे.
सोबतच हवामान विभागाने देखील शेतकऱ्यांना एक मोठी गुड न्युज दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या महत्वपूर्ण माहितीनुसार, मान्सून येत्या 48 तासात केरळमध्ये दाखल होणार आहे.
वास्तविक, अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनला आणखी किती विलंब होणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते? शेतकऱ्यांची देखील धाकधूक वाढली होती. मात्र आता हवामान विभागाने येत्या 48 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज जारी केला असून यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याबाबत कृष्णानंद होसाळीकर यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, बिपरजॉय चक्रीवादळ आता तीव्र रूप धारण करत आहे. यामुळे मान्सून आगमनास विलंब होण्याची भीती व्यक्त होत होती. वास्तविक या चक्रीवादळामुळे मान्सून ऑलरेडी लांबला आहे. याआधी आयएमडीने 4 जूनला मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असं सांगितलं होतं.
हे पण वाचा :- खुशखबर ! राज्यातील ‘या’ 1 लाख गरीब लोकांना मिळणार हक्काच घर; कोणत्या जिल्ह्यात किती लोकांना मिळणार लाभ? पहा….
मात्र तस काही झालं नाही, पण आता मान्सून येत्या 48 तासात केरळमध्ये दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनाऱ्यावर ढगाळ हवामान तयार झाले आहे. यामुळे पुढील 48 तासांत केरळमध्ये मान्सून सक्रिय होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष बाब म्हणजे केरळ किनारपट्टीवर अनेक भागांमध्ये गेल्या 24 तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस त्या ठिकाणी पडला आहे. यामुळे हे मान्सूनसाठी चांगले संकेत असल्याचे हवामान तज्ञांच्या माध्यमातून सांगितले जात आहे.
निश्चितच मान्सून आगमनास विलंब झाला असल्याने चिंतेत सापडलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर हवामान विभागाच्या या अंदाजामुळे स्मितहास्य फुलणार आणि आता शेत शिवारात शेतकऱ्यांची लगबग देखील वाढणार आहे.
हे पण वाचा :- आता सातबारा उतारा ‘या’ मोबाईल एप्लीकेशनवरूनही डाउनलोड करता येणार, 15 रुपये फि लागणार, पहा प्रोसेस