Simple One Electric Scooter : सिंगल चार्जमध्ये 212 किमी धावणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Simple One Electric Scooter : सिंपल एनर्जीने आपली मागील महिन्यात एक शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. जिची डिलिव्हरी आता सुरू झाली आहे. जर किमतीचा विचार केला तर कंपनीची ही स्कुटर 1.45 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येणार आहे.

आपल्या इतर स्कुटर्सप्रमाणे या इलेक्ट्रिक स्कुटरमध्येही कंपनीने उत्तम फीचर्स दिले आहेत. जी स्कूटर एका चार्जमध्ये 212 किमी चालते. दरम्यान जबरदस्त मायलेज आणि उत्तम फीचर्स असल्याने ही स्कुटर मार्केटमधील इतर स्कुटर्सना टक्कर देऊ शकते.

2021 मध्ये करण्यात आले अनावरण

ऑगस्ट 2021 मध्ये सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण केले आहे. कंपनीने उत्पादन प्रकार आणण्यासाठी दोन वर्षांपेक्षा कमी वेळ घेतला असून या स्कूटरला सुरुवातीपासून एक लाखापेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्कूटरने तामिळनाडूमध्ये वार्षिक 1 दशलक्ष युनिट्सच्या उत्पादन क्षमतेसह एक प्लांट उभारला आहे.

जाणून घ्या खासियत

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 5kWh चा बॅटरी पॅक उपलब्ध असून स्कुटर एका चार्जमध्ये ते 212 किमी धावते. हे त्याच्या PMS मोटरमधून 11.3bhp पॉवर आणि 72Nm पीक टॉर्क जनरेट करत असून कंपनीची ही सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी 2.77 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग घेते. तिचा वेग 105 किमी प्रतितास इतका आहे.

डिलिव्हरी सुरू झाल्याबद्दल बोलत असताना, सिंपल एनर्जीचे संस्थापक आणि सीईओ सुहास राजकुमार म्हणाले, “आम्ही बेंगळुरूमधील ग्राहकांपासून सिंपल वनच्या डिलिव्हरी सुरू करण्यास उत्सुक असून आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही आमच्या ग्राहकांना एक उत्कृष्ट Honor अनुभव प्रदान करू शकतो. सिंपल वन हरित भविष्यासाठी या विभागात क्रांती घडवून आणू शकते.

मिळतो 750 वॅट चार्जर

दरम्यान कंपनीचे हे मॉडेल 750 वॅट चार्जरसह येते. जे 5 तास 54 मिनिटांत मानक चार्जरसह 0-80 टक्के चार्ज करता येईल. सिंपल एनर्जी भविष्यात 160-180 डीलरशिपद्वारे 40-50 शहरांमध्ये किरकोळ विक्री वाढवण्याची तयारी करत आहे.