Maharashtra Rain Alert :- बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती झाली होती. या स्थितीची तीव्रता आता कमी होत असून, ती आता चक्रीय स्थितीत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील चार दिवस यलो अलर्ट (मुसळधार पाऊस) अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
कमी दाबाचा पट्टा आणि पश्चिमी वाऱ्यांची वाढलेली तीव्रता यामुळे राज्यातील घाटमाथ्यावर संततधार पाऊस पडत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २५, २६, २७ आणि २८ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रविवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सकाळच्या सत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र होते, तर दुपारनंतर जोरदार सरी बरसत होत्या.

राज्यातील घाटमाथ्यावरील पावसाची संततधार सुरू असून, यामध्ये सर्वाधिक भिवपुरीमध्ये ९० मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल खंड ७६ मिमी. तर आंबोणे ५७ मिमी., शिरगाव ५६ मिमी., दावडी ५२ मिमी,
वाणगाव ५१ मिमी., डुंगरवाडी ४५ मिमी., ताम्हिणी ४० मिमी., ठाकुरवाडी २९ मिमी., भिरा ११ मिमी., कोयना १० मिमी., वळवण ७ मिमी., खोपोली ६ मिमी., लोणावळा ४ मिमी. आणि शिरोटा ३ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.