Maharashtra Rain : महाराष्ट्रातील तळकोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सून दाखल होऊन दोन दिवसांचा कालावधी देखील उलटला आहे. दरम्यान, मान्सून पुढील प्रवासासाठी सज्ज झाला असून राज्यातील काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून घेणार आहे. अशातच मात्र अरबी समुद्रात उठलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाबाबत एक मोठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

IMD ने सांगितले की, हे अरबी समुद्रात आलेले या वर्षातील पहिले चक्रीवादळ आहे. हे आता गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. हे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकणार असा अंदाज आहे. मात्र असे असले तरी या वादळाचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर देखील जाणवणार आहे.
या वादळामुळे आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार वारे वाहतील आणि वादळी पाऊस होईल अशी शक्यता आहे. आज मंगळवार, 13 जून 2023 रोजी देखील अरबी समुद्रातील या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ लोकांना तब्बल 17 हजार 929 एकर जमीन मिळाली मोफत ! कोणाला मिळतोय लाभ? पहा….
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस
खरंतर, या चक्रीवादळाचा परिणाम हा किनारपट्टीवरील भागात होणार आहे. यामुळे राज्यातील मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये जोरदार वारा वाहण्याची शक्यता असून वादळी पाऊस देखील होणार असा अंदाज आहे.
चक्रीवादळ जरी पुढे सरकले असले तरीदेखील याचा आस मागे राहिला असून चक्रीवादळाचे ढग पाऊस पडत असतात. यामुळे आज मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एकंदरीत या चक्रीवादळामुळे राज्यातील मुंबई आणि किनारपट्टीवरील भागात वादळी पावसाचा आज अंदाज आहे. तर दुसरीकडे राज्यातील ज्या भागात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही त्या भागात मान्सूनची वाट पाहिली जात आहे.
हे पण वाचा :- यंदाच्या खरीपात बाजरी लागवड करणार आहात काय? मग ह्या दोन जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार !