ठरलं एकदाच…! 36 जिल्ह्यातील 4,644 तलाठी पदाच्या भरतीच वेळापत्रक आलं समोर ; ‘या’ तारखेला होणार तलाठी परीक्षा, IBPS ने दिलेत 2 पर्याय, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Talathi Bharati 2023 : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता जे विद्यार्थी गट क संवर्गातील आणि खासकरून तलाठी या पदासाठी तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही बातमी खास आहे.

कारण की, गट क संवर्गातील तलाठी या रिक्त पदाच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून परवानगी मिळाली आहे. तलाठीची पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून आता लवकरच तलाठीची भरती निघणार आहे. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी पदभरतीची वाट पाहिली जात होती.

मागे प्रसार माध्यमांमध्ये तसेच सोशल मीडियामध्ये एक फेक न्युज देखील व्हायरल झाली होती. यामुळे तलाठी पद भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली. मात्र आता तलाठी पदभरती साठी शासनाने मान्यता दिली आहे. 

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेच्या धर्तीवर लागू होणार गॅरंटी पेन्शन योजना, दोन्ही योजनेमधील फरक वाचा….

आता भूमी अभिलेख विभागाकडून त्यांनी नियुक्त केलेल्या कंपनीच्या माध्यमातून लवकरच याची परीक्षा घेतली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पदभरतीच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यातील 4644 रिक्त तलाठ्यांची पदे भरली जाणार आहेत.

खरंतर भाऊसाहेबांची म्हणजे तलाठ्यांची पदे रिक्त असल्यामुळे गाव खेड्यातील कारभार हा खूपच मंद झाला होता. प्रभारी आणि अतिरिक्त तलाठ्यांवर कामाचा अधिक बोजा वाढत होता. परिणामी तलाठ्यांची रिक्त पदे भरणे शासनासाठी अपरिहार्य बाब होती.

शासनाकडून यासाठी प्रयत्न देखील केले जात होते. दरम्यान तलाठी पदभरती मध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आता दूर झाल्या असून लवकरच याची भरती आयोजित होणार आहे.

विशेष म्हणजे तलाठी पदभरतीसाठी लवकरच परीक्षा घेतली जाणार असून ही परीक्षा टिसीएस या कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. यासाठी कंपनीने दोन तारखा दिल्या आहेत. या दोन तारखेपैकी कोणत्या तरी एका तारखेला परीक्षा घेतली जाणार आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ लोकांना तब्बल 17 हजार 929 एकर जमीन मिळाली मोफत ! कोणाला मिळतोय लाभ? पहा….

केव्हा होणार परीक्षा

भुमिअभिलेख विभागाने तलाठी पदभरतीची परीक्षा घेण्यासाठी टीसीएस या कंपनीची नियुक्ती केली असून या कंपनीने 12 ऑगस्ट किंवा 17 सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत. यामुळे या दोन पैकी कोणत्यातरी एका तारखेला तलाठी भरतीची परीक्षा होणार आहे.

याबाबत जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी लोकमतला एक मोठी माहिती दिली आहे. रायते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेसाठी लिंक खुली करण्याची परवानगी मागितली आहे. म्हणून येत्या 15 जूनपर्यंत ही लिंक खुली होईल, अशी आशा आहे.

तसेच त्यांनी सांगितले की, या भरतीसाठी जवळपास पाच लाख उमेदवार अर्ज करणार अशी शक्यता आहे. मात्र तलाठी भरतीसाठी एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे.

म्हणून अर्ज भरताना उमेदवाराने यादेखील गोष्टीची काळजी घेणे जरुरीचे राहणार आहे. तसेच या परीक्षेसाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये परीक्षा फी राहील अशी माहिती समोर आली आहे.

हे पण वाचा :- यंदाच्या खरीपात बाजरी लागवड करणार आहात काय? मग ह्या दोन जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार !