Maharashtra Weather Update : राज्यात सध्या तापमान 40 अंश सेल्शिअसच्या आसपास आहे. यामुळे उकाडा जाणवत आहे. नागरिक उकाड्याने अक्षरशा हैराण आहेत. यामुळे मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहिली जात आहे.
शेतकरी बांधव देखील मान्सून आगमनाची वाट पाहत आहेत. मान्सूनचे आगमन होईल, खरीप हंगामातील पीक पेरणी वेळेत पूर्ण होईल आणि या हंगामातून तरी चांगले उत्पादन मिळवता येईल अशी शेतकऱ्यांची आशा आहे. अशातच भारती मान्सूनची खबरबात भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून समोर येत आहे.

त्यानुसार, यंदा मान्सूनच आगमन केरळात तीन दिवस उशिरा होणार आहे. साधारण 4 जूनच्या सुमारास केरळमध्ये मानसून दाखल होईल त्यानंतर एका आठवड्यात तळकोकणात येईल आणि त्यानंतर चार ते पाच दिवसात राजधानी मुंबईत मान्सून पोहोचेल आणि मग तेथून संपूर्ण राज्यभर मान्सून आपले पाय पसरवणार आहे.
निश्चितच, मान्सूनची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी ही सुखद बातमी आहे. दरम्यान राज्यात मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. यामुळे राज्यात आज अर्थातच 29 मे 2023 रोजी तसेच उद्या 30 मे 2023 रोजी काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रातील जवळपास 17 जिल्ह्यात आज आणि उद्या पाऊस पडणार आहे.
कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 17 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
निश्चित, यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे मात्र शेतकऱ्यांची शेती कामे खोळंबण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस
IMD ने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज 29 मे 2023 सोमवारी महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग; मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर; मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच उद्या 30 मे मंगळवारी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग; मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर; मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या 17 जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
शेतकऱ्यांसाठी धक्कादायक !
Imd म्हणतंय की, यंदा मान्सून सामान्य राहील. जून ते सप्टेंबर या कालावधीत म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात संपूर्ण देशात ९६ टक्के पाऊस होईल. या काळात देशाच्या काही भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊसही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण देशाच्या बहुतांशी भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस होणार असे देखील यावेळी आयएमडीने नमूद केल आहे.
विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात देखील मान्सून काळामध्ये कमी पावसाची शक्यता आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात जून महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हा हवामान विभागाचा दुसरा अहवाल असून जुलै महिन्यात भारतीय हवामान विभागाचा मान्सून संदर्भात तिसरा सुधारित अहवाल सादर होणार आहे. यामुळे त्या अहवालात आय एम डी काय सांगते याकडे विशेष लक्ष राहणार आहे.