Smartphone Buying Tips : नवीन फोन खरेदी करत असाल तर लक्षात ठेवाच ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी! नाहीतर हजारो रुपये वाया गेले समजा


नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु फोन घेत असताना सावध असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर खूप मोठे नुकसान होऊ शकते.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smartphone Tips : देशात प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कंपन्यांचे कित्येक स्मार्टफोन लाँच होत असतात. स्मार्टफोन लाँच होण्याचे प्रमाण जसे जास्त आहे तसेच ते खरेदी करण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात फोन खरेदी केले जात आहे.

जर तुम्हीही नवीन फोन खरेदी करणार असाल किंवा खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण तुम्ही फोन खरेदी करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.

लक्षात ठेवा या गोष्टी

बजेट आणि गरज :

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करत असाल तर त्यापूर्वी तुमचे बजेट ठरवा. त्यानंतर तुम्हाला या फोनमध्ये कोणते स्पेसिफिकेशन हवे आहेत ते ठरवा.

कॅमेरा स्पेसिफिकेशन:

सध्या अनेकजण फोनवरूनच फोटो घेत असतात, त्यामुळे जेव्हा तुम्ही नवीन फोन खरेदी करत असता तेव्हा तुमच्या आवडीनुसार कॅमेरा सिस्टमचा फोन घ्या. तसेच त्या फोनच्या कॅमेऱ्याचा सेन्सर आकार, रिझोल्यूशन, छिद्र तपासावे.

मजबूत बॅटरी:

तसेच या फोनमध्ये मजबूत बॅटरी असणे खूप गरजेचे आहे कारण कमी बॅटरी असणारे स्मार्टफोन लवकर संपतात. कमीत कमी 5000mAh बॅटरी असणारा फोन खरेदी करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टची सुविधा आहे का ते पहा.

स्क्रीनचा आकार:

गरजेनुसार फोनचा स्क्रीन आकार ठरवा कारण जे ग्राहक फोनवर खूप अभ्यास करतात किंवा चित्रपट पाहतात त्यांच्यासाठी मोठ्या स्क्रीनचे फोन चांगले आहेत.

प्रोसेसर:

फोनमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्याचा प्रोसेसर. नेहमी जलद कामगिरीसाठी चांगला प्रोसेसर असणारा स्मार्टफोन खरेदी करा.

पुनरावलोकन पहा:

सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्मार्टफोन खरेदी करत असताना फीचर्स आणि फीचर्सशिवाय, नवीन फोनचे पुनरावलोकन वाचा आणि पहा. इतकेच नाही तर त्या कोणत्या फोनमध्ये काय चांगले आहे किंवा काय वाईट आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला याची मदत होईल. कारण कंपन्या कधीच त्यांच्या फोनबद्दल वाईट बोलत नाहीत.