शेतकऱ्यांनो तयारीला लागा ! आजपासून ‘इतके’ दिवस महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात बरसणार पावसाच्या धारा, तुमच्याकडे पाऊस आहे की नाही? वाचा….

Ajay Patil
Published:
Monsoon News

Monsoon News : मान्सूनबाबत काल एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. काल अर्थातच 8 जून 2023 रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले. भारतीय हवामान विभागाने काल केरळमध्ये मान्सून पोहोचल्याची पुष्टी केली. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभूमीवरील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

खरंतर गेल्या कित्येक दिवसांपासून मान्सूनची आतुरतेने वाट पाहिली जात होती. काल मात्र त्याचे आगमन केरळात झाले यामुळे शेतकरी बांधव विशेष प्रसन्न आहेत. पण भारताच्या भूमीत मान्सून दाखल झाला म्हणून आता महाराष्ट्राच्या भूमीत मान्सून केव्हा दाखल होणार असा? देखील प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जात आहे.

अशातच, राज्यातील मान्सून संदर्भात ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी एक महत्त्वाचे अपडेट दिली आहे. खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचे आगमन मुंबईमध्ये दरवर्षी 10 जूनला होत. 

हे पण वाचा :- यंदा सोयाबीनवर ‘या’ हानिकारक किटकाचा होऊ शकतो प्रादुर्भाव; किडीचा हल्ला झाला तर कस मिळवणार नियंत्रण? वाचा….

यंदा मात्र मानसून मुंबईत जवळपास 18जूनला दाखल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यामध्ये चार दिवसांचा फरक पडू शकतो. चार दिवस लवकर किंवा चार दिवस उशिराने मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. अर्थातच 14 जून ते 22 जून दरम्यान मान्सूनचे मुंबईमध्ये आगमन होणार असं मत व्यक्त केल जात आहे.

मुंबईमध्ये मान्सून पोहोचल्यानंतर मग सह्याद्रीचा माथा ओलांडून मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. यामुळे भारताच्या भूमीवर अर्थातच केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर तळकोकणात मान्सून केव्हा पोहोचतो आणि त्यानंतर मुंबईमध्ये मानसून केव्हा पोहोचतो याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. दरम्यान आता राजधानीत मान्सून आगमनाची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. 

हे पण वाचा :- पंजाब डख : यंदा मान्सून केरळकडून येणार नाही; मग कुठनं येणार पाऊस? वाचा काय म्हटले डख….

14 जून ते 22 जूनच्या कालावधीत मान्सून मुंबईमध्ये धडकणार आणि पुढे मग संपूर्ण महाराष्ट्रात त्याची वाटचाल सुरू होणार आहे. तत्पूर्वी मात्र राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पासून राज्यातील कोकण, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे.

आज अर्थातच 9 जून ते 12 जून पर्यंत राज्यातील मुंबई, कोकण, धुळे, नंदुरबार, जळगाव, नासिक, अहमदनगर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, तसेच सोलापूर या 14 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तसेच, दरम्यानच्या काळात मराठवाडा आणि विदर्भात देखील ढगाळ वातावरण राहील आणि काही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता तयार होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

हे पण वाचा :- पुण्यातून महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी भारत गौरव रेल्वे ‘या’ तारखेला होणार रवाना; कोणत्या तीर्थक्षेत्रांना देणार भेट, पहा संपूर्ण रूटमॅप

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe