शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! राज्यातील २५ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आणि सोबत पावसाची हजेरी, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

राज्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जर आपण बघितले तर थंडीचा कडाका जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला जाणवायला लागला होता. परंतु गेल्या दोन दिवसापासून जर आपण राज्यातील हवामान बघितले तर थंडीच्या प्रमाणामध्ये अचानकपणे घट झाल्याचे दिसून येत आहे व बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी धुक्याची चादर पसरल्याचे दिसत आहे.

Ajay Patil
Published:
rain

Rain Prediction In Maharashtra:- राज्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जर आपण बघितले तर थंडीचा कडाका जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला जाणवायला लागला होता. परंतु गेल्या दोन दिवसापासून जर आपण राज्यातील हवामान बघितले तर थंडीच्या प्रमाणामध्ये अचानकपणे घट झाल्याचे दिसून येत आहे व बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी धुक्याची चादर पसरल्याचे दिसत आहे.

या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल अशी शक्यता असून पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. जर आपण काल बघितले तर राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अंशतः ढगाळ हवामान होते

व आज देखील अशाच प्रकारचे ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे राज्याच्या किमान तापमानामध्ये देखील चढ-उतार होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या ठिकाणी आहे सध्या कमी दाबाचे क्षेत्र
सध्या जर आपण बघितले तर पूर्व- मध्य बंगालच्या उपसागरामध्ये ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले असून ही कमी दाबप्रणाली आज म्हणजेच मंगळवारी उत्तर तामिळनाडू तसेच दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे व त्यामुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचे प्रमाण कमी अधिक होत आहे.

या सगळ्या प्रणालीमुळे राज्यात देखील तीन दिवस काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून तापमानामध्ये चढ-उतार राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उद्या म्हणजेच गुरुवारी राज्यातील अहिल्यानगर तसेच पुणे व जालना कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर आणि बीड व परभणी या जिल्ह्यांमध्ये काही भागात ढगाळ हवामान राहणार असून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शुक्रवारी या जिल्ह्यांमध्ये आहे वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
इतकेच नाहीतर नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही भागात वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर शुक्रवारी राज्यातील नंदुरबार, जळगाव आणि धुळे व नाशिक व त्यासोबतच छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, मराठवाड्यातील जालना, परभणी आणि बीड व विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये आहे गारपीटीची शक्यता
तसेच शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्हे व असे मिळून राज्यातील 25 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यता देखील आहे व यामध्ये विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव,

नासिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यात व लगतच्या परिसरामध्ये गारपीटीची शक्यता अधिक असल्याची माहिती सेवानिवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

ही आहेत सध्याच्या गारपिटीच्या शक्यतेमागील कारणे
26 डिसेंबर दरम्यान देशात प्रवेश केलेले प्रखर पश्चिम प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून व राजस्थानच्या आग्नेयला दीड ते दोन किमी उंचीपर्यंतच्या पातळीतील थंड कोरडे चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे

व त्यामुळे 800 मीटर उंचीपर्यंतच्या खालच्या पातळीतील अरबी समुद्रातून नैऋत्य दिशेकडे वारे येत असून बंगालच्या उपसागरातून पूर्व दिशेकडे येणारे आद्रतायुक्त वारे अशा तीन वाऱ्यांच्या टक्करीतून घनीभवन होऊन गारपिट होण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती देखील माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe