एप्रिल महिन्यात पुन्हा अवकाळी पाऊस ! कोणत्या तारखेला बरसणार ? पंजाबरावांनी दिली मोठी माहिती

Published on -

Panjabrao Dakh News : मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. विशेष म्हणजे 16 मार्च ते 20 मार्च दरम्यान महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसला. या कालावधीमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील झाली.

परिणामी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. 20 तारखे नंतर मात्र राज्यात तापमान वाढ पाहायला मिळाली. राज्यातील अनेक भागात तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा विक्रमी टप्पा ओलांडला. विदर्भातील काही शहरांमध्ये तर तापमान 42°c पर्यंत पोहोचले.

उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. अशातच मात्र कालपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे.

काल उत्तर महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये हलका पाऊस पाहायला मिळाला. मध्य महाराष्ट्रात सुद्धा काल अर्थातच 29 मार्च 2024 ला हलक्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली.

हवामान खात्याने आज देखील राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात देखील पावसाचा अंदाज आहे.

उद्या विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील राज्यात 31 मार्च पर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे.

31 मार्चपर्यंत राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस बरसणार असे डख यांनी यावेळी म्हटले आहे. परंतु यावेळी खूप मोठा पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी फार काळजी करण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितले आहे.

एप्रिल महिन्यातही पाऊस

दुसरीकडे पंजाब रावांनी पुढल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यातही अवकाळी पाऊस बरसणार असे म्हटले आहे.

मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसानेच झाली होती आणि आता एप्रिल महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेच होणार असे पंजाब रावांनी यावेळी आपल्या हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे. पंजाबरावांनी 1 एप्रिल ते पाच एप्रिल या कालावधीत राज्यातील हवामान कोरडे राहणार असे म्हटले आहे.

पण, 6 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिलला महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News