Weather Update : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आणि उकाड्याने हैरान झालेली सामान्य जनता मान्सूनची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा मात्र मान्सूनचा काही वेगळाच स्वॅग आहे. त्याच्या मनात काय सुरू आहे याबाबत भारतीय हवामान विभाग देखील अनभिज्ञ असल्याचे पाहायला मिळत आहे.
खरंतर, आय एम डी अर्थातच भारतीय हवामान विभागाने यावर्षी कोकणात चार जूनला मान्सूनच आगमन होईल असा धिंडोरा गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वाजवला होता. मात्र मान्सूनने ऐनवेळी कलाटणी घेतली असून आता मान्सूनचे आगमन आणखी तीन ते चार दिवस उशिराने होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी काही काळ त्याची वाटच पहावी लागणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; तूर पिकाला ‘या’ खतांची मात्रा द्या, हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवा
अशातच मात्र हवामानात मोठा बदल झाला असून पुढील दोन ते तीन तासात राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून नुकताच राज्यातील काही जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 4 जिल्ह्यात येत्या दोन ते तीन तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहणार आहे. खानदेशातील जळगाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नासिक तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यात पुढील दोन ते तीन तासात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असा अंदाज आहे.
हे पण वाचा :- पंजाब डख : अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ‘या’ दिवशी मुसळधार पाऊस पडणार ! मान्सून आगमन लांबणार ? पहा….
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक केंद्राने हा हवामान अंदाज जारी केला आहे. खानदेश, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यातील या चार जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, असाही इशारा देण्यात आला आहे.
साहजिकच हवामान विभागाच्या या अंदाजामुळे या संबंधित भागातील सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना अधिक सजग राहून आपली कामे करायची आहेत. सध्या शेतकरी बांधव शेत शिवारात खरीप पूर्व कामासाठी लगबग करत आहे. यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी शेती कामे करताना विशेष सावधानता बाळगणे अपेक्षित आहे.