अहमदनगर :- केडगावमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी शिवसेनेने कॅण्डलमार्च काढून श्रध्दांजली वाहिली.
कॅण्डलमार्चमुळे प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह ८० जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

केडगावातील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची ७ एप्रिल २०१८ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने शिवसेनेने कॅण्डलमार्च काढून दोन्ही शिवसैनिकांना श्रध्दांजली वाहिली.
राठोड यांच्यासह शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, योगिराज गाडे आदी मार्चमध्ये सहभागी झाले होते.
केडगाव गावठाण, अंबिका बसस्टॉप, शाहूनगर मार्गे सुवर्णानगर असा कॅण्डलमार्च काढण्यात आला. मात्र, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग झाला.
कोतवाली पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल नवनाथ गोरे यांच्या फिर्यादीवरून राठोड, गाडे, सातपुते यांच्यासह ८० जणांच्या विरूध्द जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- आता फक्त 35 हजारात मिळणार नवा कोरा ट्रॅक्टर ! सरकार करणार मदत
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – जळगाव नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार, कसा असणार रूट?
- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांचे जन्म – मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले जाणार, कारण काय ?
- महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा नवा जीआर ! आता ‘हे’ एक काम केल्याशिवाय 1500 रुपये मिळणार नाही
- पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षा शुल्कात झाली मोठी वाढ