जामखेड :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत देशाची वाट लावली. यापुढे ते हेच करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ व्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांनी चोंडीला भेट देऊन स्मृतिस्तंभास अभिवादन केले. पालकमंत्री राम शिंदे यांनी घोंगडी देऊन त्यांचा सत्कार केला.

पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, भाजप हटवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी हा पर्याय नाही. राष्ट्रवादी हा काँग्रेसमध्ये विलीन होत आहे. ते घाबरले आहेत.

मुस्लिम समाज त्यांच्याकडून निसटून चालला आहे. त्यांनी मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. त्यामुळे ते वंचित आघाडीकडे आकर्षित होत आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादीने विधानसभेसाठी प्रस्ताव दिला आहे का, असे विचारले असता आंबेडकर म्हणाले, तसा प्रस्ताव आलेला नाही. वृत्तपत्रे व वाहिन्यांवर चर्चा चालू आहे.
त्यांच्याकडे जायचे कशासाठी? वंचितसाठी काय अजेंडा त्यांच्याकडे आहे? अजेंडा असल्याशिवाय काही शक्य नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे आंबेडकर म्हणाले.
- ब्रेकिंग ! सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण, आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अधिकृतरित्या मंजुरी मिळाली
- पुण्यावरून चालवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या वंदे भारतला ‘या’ स्थानकावर थांबा झाला मंजूर !
- महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचाऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार 3 टक्के डीए वाढीचा लाभ, वाचा सविस्तर
- Mumbai Railway : मुंबईकरांसाठी खुशखबर ! आणखी एक सुपरफास्ट एक्सप्रेस; कोणकोणत्या स्टेशनंवर थांबा घेणार ?
- Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीवर मिळतोय मोठा डिस्काउंट ! ‘या’ तारखेपासून सुरु होणार सिक्रेट ऑफर्स













