सोनई : नेवासा तालूक्यातील चांदा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याच्या कारणावरून अहमदनगरजवळील नागापूर येथील चौघा आरोपींना सोनई पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मदतीने अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूृत्रांकडून समजलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीच्या अपहरणाबाबत सोनई पोलीस ठाण्यात २६ मे २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल होता.
याबाबतची माहिती मिळाल्यानुसार सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास देशमाने यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मदतीने नागापूर येथे शोध घेऊन चौघा आरोपींना अटक करून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली.
आरोपी सोनू राजू वाघमारे, सुनीता परशू कांबळे, छाया प्रभाकर पठारे, काजल लखन म्हात्रे (सर्व रा. नागापूर, ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
- Mahavitaran vidyut sahayak Bharti : महावितरण मध्ये तब्बल ५३४७ पदांची भरती सुरु, १० वी १२ वी पास उमेदवारांना मिळणार संधी!
- TISS Mumbai Bharti 2024 : मुंबईमध्ये TISS कंपनीमध्ये जॉब हवाय?; येथे ‘या’ पदांकरिता आजच करा अर्ज
- Ahmednagar News : सुजाण पिढी घडवण्यासाठी सुजाण पालकत्वाची गरज : दिनेश आदलिंग
- Ahmednagar News : बापरे ! मिरचीचे बियाणे आठ हजार रुपये किलो
- SBI Fixed Deposit : SBI ची बंपर व्याजदर योजना, संधी फक्त 30 सप्टेंबर पर्यंत…डिटेल्स जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी !