‘गडकरींना पाडण्यासाठी मोदी-फडणवीसांचे प्रयत्न, तर मोदींना घरी बसवण्यासाठी ‘योगीं’च्या समर्थकांची झटपट’, मोदी-गडकरी- योगींमध्ये नेमके चाललय काय?

Ahmednagarlive24 office
Published:
modi yogi gadakari

 

देशभर सध्या लोकसभेच्या निवडणुकांचा फिव्हर आहे. सध्या एका टप्प्यातील मतदान शिल्लक असून येत्या ४ जून ला निकाल लागणार आहे.

दरम्यान आता नागपुरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी पुरेपूर प्रयत्न केले असून तिकडे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला असल्याचा मोठा गौप्यस्फोट आता सामनामधील रोखठोक मध्ये संजय राऊत यांनी केला आहे.

त्यामुळे आता राजकीय वलयात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत राजकारणाबाबत केलेल्या विविध गौप्यस्फोटामुळे चर्चाना उधाण आले असून मोदी-गडकरी- योगी यांमध्ये नेमके चाललय काय? अशी चर्चा नागरिक करू लागलेत.

संजय राऊतांचा यांनी नेमका काय दावा केला?
भाजपमध्ये 4 जूननंतर नरेंद्र मोदी – अमित शहांना पाठिंबा राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी असाही दावा केला हे की, नागपुरमध्ये नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी मोदी, शहा व फडणवीस यांनी प्रयत्न केले

तसेच फडणवीस यांनी गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद पुरवल्याचे संघाचेच लोक सांगत असल्याचा गौप्यस्फोटही केलाय. परंतु जेव्हा गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटली तेव्हा फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात सहभागी झाल्याचे राऊत म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलही मोठा दावा
संजय राऊत यांनी या लेखात योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलही मोठा दावा केला असून जे गडकरींचे तेच योगींचे असे त्यांनी यात म्हटले आहे. जर शहांच्या हाती सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवणार असल्याची भावना असल्याने ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ असे संदेश योगी समर्थकांनी फिरवले असून ४ जूनला निकालामध्ये याचे परिणाम दिसतील असे देखील राऊत यांनी रोखठोक मध्ये म्हटले आहे.