Ahmednagar News : सुजाण पिढी घडवण्यासाठी सुजाण पालकत्वाची गरज : दिनेश आदलिंग

tambe

 

Ahmednagar News : सुदृढ समाज निर्मितीस अभिप्रेत असणारा सुदुढ नागरिक घडावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास महत्वाचा आहे. यासाठी जय हिंद चळवळीचे प्रणेते माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद शैक्षणिक उपक्रमांर्गत विविध उपक्रम सुरू असतात. ‘जयहिंद युवा सर्वांगीण विकास शिबिर २०२४’ जय हिंद आदिवासी आश्रम शाळा,कोळवाडा येथे दिनांक २१ ते २४ मे २०२४ निवासी शिबिर आयोजित केले होते.

यावेळी पालकांच्या प्रबोधन कार्यशाळेत बोलताना युवा व्याख्याते दिनेश आदलिंग यांनी सुजाण पालकत्वाच्या अनेक संकल्पना स्पष्ट करताना वरील प्रतिपादन केले. लहान मुले ही मातीचे गोळे नसून ऊर्जेचे स्त्रोत असतात, कोणतेही मूल हे आपल्या आई-वडिलांच्या सवयीचे प्रतिबिंब असते. बऱ्याचदा नकारात्मक गोष्टी बोलून आई-वडील लहान मुलांच्या अनेक आशा-आकांक्षाचे खच्चीकरण करतात. त्यांचा आत्मविश्वास कमी करतात. मुलांमध्ये प्रचंड क्षमता असतात. सकारात्मक विचारांची पेरणी करून त्या आपण फुलवू शकतो.असेही ते म्हणाले. रणपिसे सर यांनी रायफल शूटिंग संदर्भाने मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रामध्ये सौ.ज्योती कांचन यांनी विद्यार्थ्यांना सहज सोप्या पद्धतीने अध्ययन कसे करावे याविषयी अनेक बारकावे सांगितले. विद्यार्थ्यांना त्याचा भावी जीवनात निश्चितच उपयोग होईल.यावेळी मोठ्या संख्येने पालक व सेक्रेटरी जयहिंद लोकचळवळ डॉ. नामदेव गुंजाळ यांची उपस्थिती होती.

निवासी शिबिरामध्ये सलग चार दिवस विद्यार्थ्यांना जीवनात उपयोगी येणारे विविध जीवनोपयोगी कौशल्ये तज्ञ मार्गदर्शक प्रा.हिरालाल पगडाल, कृष्णा अडकिल्ला, मिलिंद औटी, आसोपा सर,कडलग सर,अरविंद गाडेकर,बाबा खरात,विशाल पगारे,प्रा. उदय कर्पे, सौ.दुर्गा अंकाराम, तुषार गाडेकर,प्राचार्या डॉ.संध्या खेडेकर यांच्याकडून शिकविण्यात आले.
मिलिंद औटी सर, हर्षल थेटे, जयहिंद सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. नाना गुंजाळ, क्रीडा शिक्षक अमृतवाहिनी सीबीएससी बापू कडलग यांनी विविध उपक्रम पूर्णवेळ घेतले.

शिबिरामध्ये पेमगिरी, खांडगाव, पोखरी हवेली व संगमनेर परिसरातील ‘५ वी ८ वी’ च्या जवळ जवळ १०० ते ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिर आयोजनासाठी विशेष सहकार्य दशरथ वर्पे मुख्याध्यापक जयहिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे यांचे लाभले.

जय हिंद चे प्रोजेक्ट मॅनेजर अनंत शिंदे, क्रीडा व कला शिक्षक कबीर जेडगुले,स्वप्नील कोल्हे जय हिंद आश्रम शाळा कोळवाडा येथील अधीक्षिका कल्याणी इंगळे, सारिका डुबे व लता गोडे यांनी विशेष मेहनत घेतली.

विद्यार्थ्यांशी हितगुज
माजी आमदार डॉ.सुधीर तांबे व माजी नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांनी शिबिराच्या चारही दिवस उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी हितगुज साधण्याचा आनंद घेतला. एका सदरात डॉ.सुधीर तांबे साहेब यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यदायी चहा कसा बनवायचा याचे प्रात्यक्षिक सादर केले.