Gold Loan Vs Personal Loan Vs FD Loan : आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी बँकेकडून कर्ज घेतलेले असेल. अचानक पैशांची गरज भासली की आपण बँकेचे दरवाजे ठोठावत असतो. सर्वप्रथम नातेवाईक, मित्र परिवारातून पैशांची ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न सर्वांचाच असतो. मात्र जेव्हा पैशांची ऍडजेस्टमेंट कुठूनच होत नाही तेव्हा आपण वित्तीय संस्थांकडे आपला मोर्चा वळवतो.
बँकेकडून आपात्कालीन परिस्थितीमध्ये गोल्ड लोन, पर्सनल लोन, एफडी लोन अशा विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध होत असते. परंतु या कर्ज प्रकारातील कोणत्या प्रकारचे कर्ज ग्राहकांसाठी फायदेशीर आहे ? अशी विचारणा अनेकांच्या माध्यमातून केली जात आहे.
दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर एखाद्याला अचानक पैशांची गरज भासली तर त्याने अशावेळी गोल्ड लोन, पर्सनल लोन की एफडी लोन कोणत्या प्रकारचे कर्ज काढावे ? याबाबत तज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज : तज्ञ लोक सांगतात की जेव्हा पैशांची ऍडजेस्टमेंट कुठूनच होत नसेल तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा पर्याय स्वीकारा. याचे कारण म्हणजे वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित प्रकारातील कर्ज आहे. त्यामुळे बँक सरकारी असो किंवा खाजगी बँकेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज देताना अधिकच व्याज वसूल केलं जातं.
म्हणजेच कोणतीही बँक असेल तरीही वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे चढेच राहणार आहेत. ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा डाऊन आहे त्यांना तर बँकांच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज देताना खूपच अधिकचे व्याजदर लावले जाते. वैयक्तिक कर्जासाठी काही बँका 16 ते 17 टक्क्यांपर्यंतचे व्याज वसूल करतात.
परंतु जर कुठूनच पैशांची ऍडजेस्ट मध्ये होत नसेल तर वैयक्तिक कर्जाचा पर्याय स्वीकारला तर काही वाईट नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैयक्तिक कर्जाचा पर्याय फायदेशीर आहेच यात शंकाच नाही. मात्र याचे व्याजदर हे थोडेसे अधिक असतात.
गोल्ड लोन : हा कर्ज प्रकार सुरक्षित कर्ज प्रकारात मोडतो. यामुळे बँकांच्या माध्यमातून गोल्ड लोन वर वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत कमी व्याजदर लावला जातो. गोल्ड लोन साठी जवळपास दहा ते बारा टक्क्यांपर्यंतचे व्याज आकारले जाते. मात्र गोल्ड लोन च्या काही मर्यादा असतात. म्हणजेच जेवढे सोने तुमच्याकडे असेल त्याच्या आधारावरच तुम्हाला कर्ज मिळणार आहे.
गोल्ड लोन मध्ये सोने बँकेकडे तारण ठेवून कर्ज घेतले जाते. तज्ञ लोक सांगतात की जेव्हा सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर असतात तेव्हा गोल्ड लोन घेणे अधिक फायदेशीर ठरते. कारण की अशावेळी अधिक कर्ज मंजूर केले जाते.
FD Loan : जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर तुम्ही FD Loan घेऊ शकता. जर तुम्ही बँकेत एफडी केली असेल तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये बँकेची एफ डी ब्रेक करण्याऐवजी त्या एफडीवर तुम्ही कर्ज काढू शकता. एफ डी वर कर्ज काढण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बँकेच्या माध्यमातून ताबडतोब कर्ज मंजूर केले जाते.
दुसरा फायदा म्हणजे वैयक्तिक कर्जापेक्षा कमी व्याज दरात हे कर्ज मंजूर होते. तिसरा फायदा म्हणजे खूपच कमी कागदपत्रे देऊन तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. बँकांच्या माध्यमातून 12 ते 15 टक्के दरात हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.