पारनेर – ढवळपुरी येथे असणाऱ्या तलावात तीन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.६) रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
इस्माईल बालम शेख ( वय- २०) नावेद नुरंम्हमद शेख (वय -१६) मोईन निजाम शेख (वय १४) अशी मृत्यू झालेल्या तीन भावंडांची नावे आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, उन्हाळ्याची सुट्टी असलेल्यामुळे ढवळपुरी येथील बिरोबा मंदिर लगत असलेले एका शेतात पिकाला पाणी देण्यासाठी कृत्रिम शेततळे उभारले होते.
हे तीनही भाऊ आज पोहण्यसाठी गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला बराच वेळ झाला तरी मुले घरी न आल्यामुळे या भावडांचा घरातील लोकांनी शोध घेतला
काही वेळानंतर मुले शेततलावात पोहत होते. अशी माहिती मिळताच घरातील व गावातील ग्रामस्थांनी शेततलाव जाण्यासाठी धाव घेतली
परंतु एकमेकांना वाचविण्यासाठी धडपड करणा-या तीनही भावांचा मृत अवस्थेत दिसले. या दुर्दैवी घटने बद्दल ढवळपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- कमीत कमी किती EMI वर खरेदी करता येणार ह्युंदाई क्रेटा ?
- ‘हे’ आहेत भारतातील टॉप 3 प्रॉफिटेबल बिजनेस ! एकदा सुरु झालेत की लाखोंची कमाई होणार
- बातमी कामाची ! महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, सलग इतके दिवस बँका बंद राहणार
- तुमच्या पत्नीच्या नावाने पोस्टाच्या योजनेत दरमहा 8,000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळणार 5 लाख 70 हजार 927 रुपये
- वाईट काळ संपला ! 20 ऑक्टोबर पासून ‘या’ राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार