बेलापूरः चोरीच्या उद्देशाने थांबल्याचा संशय आल्याने उक्कलगाव येथील एका युवकाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर सदर युवकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने वऱ्हाडी मडंळींना मारहाण केल्याची घटना बेलापूर खुर्द येथे घडली.
याप्रकरणी पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला. नगर येथील वऱ्हाडी मंडळी बेलापूर खुर्द येथे लग्न समारंभासाठी आली होती. वरात चालू असताना उक्कलगाव येथील युवकाला धक्का लागला, त्याचा जाब विचारला असता वऱ्हाडी मंडळींनी त्या युवकास मारहाण केली.

मारहाण झालेल्या युवकाने गावातून आपले जोडीदार बोलावून घेतले अन् दिसेल त्यांना मारहाण सुरु केली. गावातील काहींनी मध्यस्थी करुन मारामाऱ्या सोडविल्या तोपर्यंत बेलापूरचे पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले होते.
गावातील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस यांच्या मध्यस्थीने या वादावर पडदा टाकण्यात आला. परंतु, मारहाणीत ब-याच जाणांना मुका मार लागलेला होता. यात काही महिलांना देखील मारहाण झालेली होती.
काल आठवडे बाजार असल्यामुळे ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. याठिकाणी बाहेर गावाहुन लग्न समारंभासाठी लोक येतात. लग्न समारंभात कोण पाहुणे हे समजत नसल्याचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात चो-या होत असतात.
कालच्या कार्यक्रमात देखील पाच हजार रुपये व काही भांडे चोरीस गेल्याची खात्रीशीर माहिती असून कुणीही तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे चोराचे धाडस वाढले आहे. या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- महाराष्ट्रावर आता चक्रीवादळाचे संकट…! ‘इतके’ दिवस थंडी नाही फक्त वादळी पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
- मोदी सरकारची जबरदस्त योजना ! 25 लाखांचे घर घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना 4 टक्के व्याज अनुदान मिळणार, वाचा सविस्तर
- देशातील ‘या’ बँका देणार सर्वात स्वस्त कार कर्ज! कमी व्याजदरात Car Loan देणाऱ्या टॉप 7 बँका
- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी…..! सोयाबीन दरात पुन्हा मोठी तेजी, कुठे मिळतोय सर्वाधिक भाव?
- महाराष्ट्रातून जाणाऱ्या भारतातील सर्वाधिक लांबीच्या महामार्गावर हेलिकॉप्टर सेवा सुरू! चक्क हायवेवर लँड होणार हेलिकॉप्टर













