राहुरी :- पैशांच्या कारणातून विवाहित तरुणीस विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरातील भुजाड़ी इस्टेट मल्हारवारी रोड मुथा कुटुंबीय वास्तव्यास आहे,
विवाहित तरुणी सौ. संजना श्रीपाल मुथा, वय २९ हिला तिचा नवरा श्रीपाल चंदनमल मुथा याला बँकेची हप्ते भरण्याचे पैसे मागितले असता तो म्हणाला की, पैसे देणार नाही. तुला नांदविणार नाही,
असे म्हणून शिवीगाळ करुन सासु बबिता चंदनमल मुथा, सासरा चंदनमल मुथा यांनी विवाहितेस मारहाण केली, व शिवीगाळ करत धमकी दिली.
याबाबत दिलेल्या तक्रारीत विवाहितेने म्हंटले आहे कि, आरोपी नवरा श्रीपाल चंदनमल मुथा याने विषाची बाटली घेवून मला खाली पाडून तोंडात जबरदस्तीने विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान यात गंभीर स्थितीत संजना यात गंभीर स्थितीत संजना श्रीपाल मुथा या विवाहित तरुणीस नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
तिने दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी नवरा श्रीपाल चंदनमल मुथा, चंदनमल मुथा, बबित चंदनमल मुथा, रा, कोल्हार भगवती, ता. राहाता, हल्ली रा. भुजाडी इस्टेट मल्हारवाडी रोड, राहुरी यांच्याविरुद्ध शहरी पोलिसांत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- 1 जानेवारी 2026 पासून ‘हे’ 6 नियम चेंज होणार ! सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार ?
- महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातुन जाणारा आणखी एक महत्वाचा महामार्ग चौपदरी होणार ! 3 जिल्ह्यांना होणार फायदा, वाचा सविस्तर
- पुण्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! 24 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग सुरू होणार, आता शहरातील ‘हा’ भाग पण मेट्रोच्या नकाशावर
- शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! एक जानेवारी 2026 आधी ‘हे’ काम करावे लागणार, वाचा सविस्तर
- 6 लाखाच्या आत Car शोधताय ? ‘ही’ हॅचबॅक ठरणार तुमच्यासाठी फायदेशीर, भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार!