कर्जत :- तालुक्यातील कोरेगाव पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मनीषा जाधव यांनी भाजपच्या शशिकला शेळके यांचा ५३९ मतांनी पराभव केला.
राष्ट्रवादीचे समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत व फटाके फोडून आनंद साजरा केला. जाधव यांची कर्जत व कोरेगाव येथे मिरवणूक काढण्यात आली. या निकालाने पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला.

पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आघाडीच्या उमेदवार मनीषा दिलीप जाधव यांना ५२३८ मते, तर युतीच्या शशिकला शेळके यांना ४६९९ मते मिळाली. अपक्ष उमेदवार शीतल धांडे यांनी २३०९ मते घेतली.
गेल्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारतीय जनता पक्षाने हिरावून घेतली होती. पुन्हा राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून खेचून आणली.
जाधव यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, काँग्रेसचे बाळासाहेब साळुंके, तालुकाध्यक्ष किरण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, यांनी मोठे परिश्रम घेतले.
या निकालाने भाजपचे मंत्री शिंदे यांना मोठा धक्का बसला. कारण राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते.
त्यामुळे ही निवडणूक पालकमंत्री शिंदे व राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. यात अखेर पवार यांनी बाजी मारली.
- महाराष्ट्रातील ‘या’ मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला रेकॉर्डतोड भाव !
- वाईट काळ संपला ! आता हवं ते मिळणार, 16 जानेवारी 2026 पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
- महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी गुड न्यूज ! महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने घेतला मोठा निर्णय
- ……तर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 5 टक्के महागाई भत्ता वाढ! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी मिळणार मोठी गुड न्यूज
- अदानी पॉवर आणि टाटा मोटर्ससह ‘या’ 5 शेअर्स मधून कमाईची मोठी संधी ! गुंतवणूकदारांचे पैसे होणार डबल













