नेवासा – तालुक्यात तरुणीचा खून करून मृतदेह रस्त्यावर टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि महालक्ष्मी हिवरे परिसरात राहणारी तरुणी ज्योती सर्जेराव उर्फ बाळासाहेब गायके (वय २७) हिला अज्ञात आरोपीने कशानेतरी मारहाण करुन जखमी केले,
तिला अज्ञात कारणावरुन मारहाण करुन कशाने तरी ज्योती गायके हिचा गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उरेशाने ज्योती या तरुणीचे प्रेत
शेवगाव – मिरी जाणाऱ्या रस्त्यावर मिरी शिवारातील हॉटेल दोस्तीच्या पश्चिम बाजूस रोडवर आणून टाकले व अपघाताचा देखावा करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न अपघाताचा केला.
या खळबळजनक प्रकरणी मयत ज्योती सर्जेराव उर्फ बाळासाहेब गायके यांचे भाऊ दीपक अण्णासाहेब तुपे, रा. शिराळ, ता. पाथर्डी
यांनी पाथर्डी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खून करुन मृतदेह त्यावर टाकून अपघाताचा बनाव करणा-या आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
- सोन्याच्या किमतीत अजूनही तेजीचे संकेत ! दहा ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपये मोजावे लागणार ? काय सांगतात तज्ञ
- ‘हा’ आहे शेअर मार्केटचा धुरंदर स्टॉक ! 5 वर्षात दिलेत 19000 टक्के रिटर्न, दोन रुपयांच्या स्टॉकने बनवलं श्रीमंत
- महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार नव्या रेल्वे स्टेशनची भेट ! कोणत्या रेल्वे मार्गावर तयार होणार नव स्थानक ?
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! आता मेट्रोतुन प्रवास करताना ‘हे’ पदार्थ घेऊन जाता येणार नाही
- नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ! नवीन वर्षाआधीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गुड न्यूज