संगमनेर – जमीन विकल्याच्या कारणातून भाऊबंद नातेवाईकांनी संदीप रमेश ठोंबरे , वय ३५, रा. पिंपरणे, ता. संगमनेर याला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला. ही खळबळजनक घटना काल पिंपरणे गावच्या शिवारात घराजवळील रस्त्यावर घडली.
या प्रकरणी मयत संदीप रमेश ठोंबरे यांच्या पत्नी दीपाली संदीप ठोंबरे वय २५ रा. पिंपरणे शिवार यांनी काल संगमनेर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी भाऊसाहेब लक्ष्मण ठोंबरे, लक्ष्मीबाई भाऊसाहेब ठोंबरे, रा. पिंपरणे, ता संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपाली संदीप ठोंबरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी भाऊसाहेब ठोंबरे हा चुलत सासरा आहे. त्याच्याशी शेतजमिनीवरुन वाद आहे. माझ्या सास-याने त्यांच्या हिश्याच्या शेतजमिनीमधील २० गुंठे शेतजमीन विकल्याचा आरोपींना राग होता.
विकलेल्या २० गुंठे शेतजमिन घेतलेल्यांना हरकत अडथळा करून तुम्ही येथे यायचे नाही. तुम्ही येथे आले तर तुमचे तंगडे तोडू, अशी धमकी दिली.
यावरुन आरोपींनी आम्हाला तुम्ही विकलेल्या शेतजमिनीत माझी जमीन आहे, असे म्हणत तुम्हाला एकेकाला संपवून टाकील, अशी धमकी देवून पती संदीप रमेश ठोंबरे यांना लाथाबुक्क्याने व काहीतरी वस्तूने बेदम मारहाण करुन जबर जखमी केले. त्यांना प्रथम तांबे हॉस्पिटल व नंतर लोणीच्या प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र ते मयत झाले.
- दहावी – बारावीच्या परीक्षेबाबत नवा निर्णय ! जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश जारी
- अहिल्यानगरच्या शेतकऱ्याचा नाद खुळा ! अडीच एकरात मिळवले १० लाखांचे उत्पन्न
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता पीक कर्जासाठी घरबसल्या अर्ज करता येणार, दोन दिवसात खात्यात जमा होणार कर्जाची रक्कम, पहा…
- लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे आवाहन! आ.तांबेंची तत्काळ अंमलबजावणी,पहिल्याच रात्री रस्त्यांची स्वच्छता; नगराध्यक्षांसह नगरसेवक मैदानात
- मृत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांची भेट घेत पालकमंत्र्यांनी केले सांत्वन