कर्जत :- रोहित पवार यांच्या ‘सृजन’ या संस्थेच्या वतीने कर्जत-जामखेड परिसरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानात रविवारी 18 ऑगस्ट आणि सोमवार 19 ऑगस्ट रोजी कुस्तीची ही स्पर्धा होणार आहे.

18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या स्पर्धेचे उदघाटन होणार असून 18 तारखेला कर्जत आणि जामखेड तालुक्यातील 14 आणि 17 वयोगटातच्या आतील मल्लांची स्पर्धा होणार आहे.
तर 19 तारखेला भारत विरुद्ध इराण अशा आंतरराष्ट्रीय मल्लांचे सामने होतील तसेच महाराष्ट्रातील नामांकित मल्लही ह्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सर्व कुस्ती प्रेमींनी हा संदेश जास्तीत जास्त प्रसारित करावा आणि आपल्या सर्व मित्र परिवाराला आमंत्रित करावे. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुस्ती या रांगड्या खेळाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
- तुमच्या पत्नीसोबत पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत अकाउंट ओपन करा, प्रत्येक तीन महिन्यांनी मिळणार 61 हजार 500 रुपयांचे व्याज
- सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% झाल्यानंतर पगारात किती वाढ होणार?
- SBI की HDFC कोणती बँक देते सर्वात स्वस्त गृहकर्ज ! अर्ज करण्याआधी एकदा वाचाच
- HFCL Share Price: 1 आठवड्यात केले मालामाल! 11.48% चा घसघशीत परतावा…‘हा’ स्टॉक आज फोकसमध्ये
- GTLINFRA Share Price: 2 रुपयापेक्षा कमी किमतीचा ‘हा’ शेअर आज करणार मालामाल? बघा ट्रेडिंग पोझिशन