अहमदनगर : नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे शेतीच्या वादातून महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चंद्रकला भाऊसाहेब मोरे (वय 33, रा. बाबुर्डी घुमट) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
अर्जुन सुखदेव मोरे व मंदा अर्जुन मोरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी चंद्रकला मोरे या त्यांच्या घरासमोर उभ्या होत्या. या दरम्यान आरोपी तेथे आले व त्यांनी मागील भांडणाच्या व शेताच्या वादातून फिर्यादी चंद्रकला मोरे यांना गजाने मारहाण केली.

चंद्रकला मोरे यांची शशिकला यांनाही शिवीगाळ करण्यात आली. अर्जुन व मंदा मोरे या दोघांविरुद्ध भादवी कलम 326, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळणार ‘हे’ आर्थिक लाभ
- वाईट काळ संपणार ! आता ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार
- गुंतवणूकदार होणार मालामाल ! 3 दिवसात 27% रिटर्न, स्टॉक स्प्लिटची मोठी घोषणा
- मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! MSRDC ने घेतला मोठा निर्णय
- फक्त 9 महिन्यात गुंतवणूकदार झाले श्रीमंत! ‘या’ 5 म्युच्युअल फंड्सनी दिला 15% परतावा…पैसा टाकावा का?













