राष्ट्रवादीच्या शिवराज्य यात्रेत सोन्याची चैन चोरी

नगर – नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात बाजारतळ भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवराज्य यात्रा सभेचा कार्यक्रम असताना कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरुन खाली उतरत असलेले जामखेड येथील व्यापारी सुनील मनसुखलाल कोठारी यांना कोणीतरी धक्का मारला.

ते गर्दीत खाली पडल्याने राहुल नावाच्या तरुणाने त्यांना हात देवून उठविण्याचा बहाणा करुन त्यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन गळ्यात्न चोरुन नेली.

याप्रकरणी सुनील कोठारी या वयापाऱ्याने जामखेड पोलिसात फिर्याद दिल्यावरुन राहुल नावाचा स्टेजवरुन तरुण रा. जामखेड व इतर दोन जामखेड अनोळखी तरुण अशा तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.