नेवासा :- आमदार बाळासाहेब मुरकुटे हे विकास दिंडीच्या माध्यमातून मंगळवारपासून १२ सप्टेंबरपर्यंत नेवासे तालुक्यातील गावोगावी जनजागृती करणार करणार आहेत.
केंद्र व राज्य सरकारने गोरगरिबांसाठी राबवलेल्या योजनांसह लोकप्रतिनिधी नात्याने तालुक्यातील विकासकामांचा लेखाजोखाही ते गावोगावच्या बैठकांत जनतेसमोर ठेवणार आहेत.

जिल्ह्यात विकासकामांचा सर्वाधिक ओघ नेवासे तालुक्यात आणल्याचा आमदार मुरकुटे यांचा दावा आहे. तालुक्यातील प्रमुख रस्ते, सभामंडपासह अंतर्गत रस्ते,
नेवासे नगर पंचायतसाठी आणलेला निधी, स्पर्धा परीक्षा केंद्रे, वीज उपकेंद्रे, तसेच केंद्र वराज्य सरकारच्या योजना गोरगरिबांपर्यंत कशा पोहोचवण्यात आल्या याची माहिती ते विकास दिंडीतून देणार आहेत.
आम्ही विकासाचे कर्तव्य पार पाडले, तुम्ही आता इतिहास घडवण्याचे कर्तव्य पार पाडा असा उपदेश मुरकुटे दिंडीत करणार आहेत.
- लाडक्या बहिणींना केव्हा मिळणार नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता ? समोर आली मोठी अपडेट
- शेअर मार्केटमधील ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना बोनस शेअर अन Dividend चा लाभ देणार
- महाराष्ट्र राज्य शासन ‘या’ गावांमधील नागरिकांना वाटणार 5,000 कोटी ! प्रत्येकजण होणार करोडपती, कसा आहे नवा प्रकल्प?
- वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट ! PM मोदी 3 Vande Bharat ला दाखवणार हिरवा झेंडा, कसे असणार रूट?
- सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आता एक तोळा सोने खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे













