शेवगाव :- तालुक्यातील मुरमी येथे पावसात अंगावर वीज पडल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देवराव साहेबराव गरड (वय ७०), असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना गुरुवारी रोजी रात्री नऊ वा. घडली.
तर याच दिवशी सामनगाव येथे पावसामुळे गंगाधर म्हस्के यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून एक गाय दगावली. शुक्रवारी देवराव गरड हे घराच्या पडवीत झोपले होते. रात्री साडेनऊच्यादरम्यान पाऊस सुरू झाला, या वेळी वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तसेच घराची भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले. गरड यांच्यामागे अंध पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे, असा परिवार आहे. प्रा. शिक्षक बॅंकेचे माजी संचालक विनोद फलके यांचे ते चुलत सासरे होते. सामनगाव येथे जोरदार पावसामुळे गंगाधर म्हस्के यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून गाय दबली.
म्हस्के यांचे चिरंजीव मेजर अनिल म्हस्के, रुपेश म्हस्के व ग्रामस्थांनी गायीवर पडलेली भिंत बाजूला सारली. मात्र, गाय दगावली. दोन्ही घटनांचा तलाठी महानंदा काशिद यांनी केला आहे. दरम्यान, आमदार मोनिका राजळे यांनी व जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी स्वतंत्रपणे मयत गरड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
- आठवा वेतन आयोग : 30 हजार, 50 हजार आणि 80 हजार बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ?
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ई-पीक पाहणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ
- Vikran Share Price: ‘हा’ स्मॉल कॅप स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांका जवळ! आज छप्परफाड कमाईची संधी?
- RPOWER Share Price: बापरे! 5 वर्षात दिला 1479.33% रिटर्न… तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?
- Tata Steel Share Price: लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी टाटाचा ‘हा’ शेअर उत्तम? 5 वर्षात दिलाय 333.1% परतावा