ॲडलेड : रात्री झोपेमध्ये पाहिलेले स्वप्न तुम्ही सकाळी उठताच विसरून जात असाल तर परेशान होण्याची गरज नाही. कारण आता शास्त्रज्ञांनी एका अध्ययनातून स्वप्ने आठवणीत ठेवण्याची पद्धत शोधून काढली आहे.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ब-६ जीवनसत्व स्वप्ने आठवणीत ठेवण्यात सहाय्यक ठरते. या अध्ययनात शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियातील शंभर लोकांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांनी पाच दिवस झोपण्याआधी ब-६ जीवनसत्वाची सप्लिमेंट घेतली होती.

ॲडलेड विदयपीठाच्या स्कुल ऑफ सायकोलॉजीच्या डेनहोम ऑस्पी यांनी सांगितले की, प्लेस्बोच्या तुलनेत ब-६ जीवनसत्व घेतल्याने स्वप्ने आठवण्याच्या क्षमतेत सुधारणा होते. ब-६ जीवनसत्वामुळे ना लोकांच्या स्वप्नांचे जीवंतपण प्रभावित होते, ना त्यांच्या झोपेचा पॅटर्न प्रभावित होतो.
या अध्ययनात सहभागी लोकांना शास्त्रज्ञांनी झोपण्याआधी २४० मिलीग्रॅम ब-६ जीवनसत्व सप्लिमेंट घेण्यास सांगितले. हे सप्लिमेंट घेण्याच्या आधी अनेकजणांना क्वचितच स्वप्न सकाळी आठवत असे. मात्र हे अध्ययन पूर्ण होईपर्यंत सगळ्यांची स्वप्ने आठवणीत ठेवण्याची क्षमता जबरदस्त सुधारल्याचे दिसून आले.
- ८ राशींवर लक्ष्मीची कृपा; धन, समृद्धी आणि भरभराट, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
- मुंबई, पुणे, नागपूर, ठाणेनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरात धावणार मेट्रो !
- 50 हजार मासिक पगारातून मजबूत आणि सुरक्षित गुंतवणूक पोर्टफोलिओ कसा उभाराल?
- भारताची सर्वात आळशी ट्रेन! फक्त 46 किमीचा प्रवास पूर्ण करायला लागतात तब्बल 5 तास, तरीही तिकिटांसाठी झुंबड
- बीडच्या शेतकऱ्याची कमाल! दुष्काळी बीडमध्ये खजूराची यशोगाथा: दीड एकरात १०–१२ लाखांचे उत्पन्न,













